corona deaths less esakal
नाशिक

दिलासादायक! मेमध्ये प्रथमच 30 पेक्षा कमी मृत्‍यू

अरूण मलाणी

नाशिक : मे संपत आलेला असताना, महिनाभर जिल्‍ह्यात दर दिवशी कोरोनामुळे (corona virus) होणाऱ्या मृत्‍यूंची (corona death) संख्या तीसपेक्षा अधिक राहत होती. रविवारी (ता. ३०) जिल्‍ह्यात २९ मृत्‍यूंची नोंद झाली. महिनाभरात प्रथमच ही संख्या तीसच्‍या आत राहिली. (Less-than-30-deaths-for-first-time-in-May-nashik-marathi-news)

मेमध्ये प्रथमच तीसपेक्षा कमी मृत्‍यू

रविवारी नाशिक महापालिका क्षेत्रात २३४, नाशिक ग्रामीणमध्ये ४०१, मालेगावला ११, तर जिल्‍हाबाहेरील २४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. कोरोनामुक्‍त रुग्‍णांमध्ये नाशिक ग्रामीणमधील ६२८ रुग्‍णांचा समावेश आहे. नाशिक शहरातील साडेतीनशे, मालेगावच्‍या दहा, तर जिल्‍हाबाहेरील १५ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. २९ मृतांपैकी सर्वाधिक २० मृत नाशिक ग्रामीणमधील असून, आठ मृत नाशिक महापालिका, तर एक मृत मालेगाव महापालिका हद्दीतील आहे. ग्रामीण भागात नांदगाव व मालेगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी चार बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. कळवणच्‍या तीन, येवला, दिंडोरी व सिन्नर तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोघा बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. नाशिक, सटाणा, इगतपुरी येथील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला. दिवसभरात ६७० पॉझिटिव्‍ह आढळले, तर एक हजार तीन रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत ३६२ ने घट झाली. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात दहा हजार १३३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

प्रलंबित अहवालांचा आकडा हजाराच्‍या आत

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, प्रलंबित अहवालांचे प्रमाणही काही प्रमाणात वाढले होते. मात्र, बऱ्याच दिवसांनी रविवारी हा आकडा एक हजाराच्‍या आत राहिला. सायंकाळी उशिरापर्यंत ९४६ अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील ४८७, नाशिक शहरातील ३४१, मालेगावच्‍या २० रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ९६ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका हद्दीतील ९९७ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात सहा, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये ६८, तर मालेगावला २० रुग्‍ण दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT