After the cancellation of Faiz Bank license, there was chaos in the bank.  
नाशिक

Nashik News: फैज बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शहरातील दी फैज मर्कंटाइल को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शहरातील दी फैज मर्कंटाइल को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ३०) पासून व्यवसाय बंद झाल्यापासून बँकेने बँकिंग व्यवसाय करणे बंद केले.

यामुळे बँकेत ठेवी असलेल्या ठेवीधारांमध्ये भीती पसरली आहे. (License of Faiz Bank canceled by RBI nashik news)

सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आले आहेत. यासंदर्भात उपनिबंधक फय्याज मुलाणी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. तसेच बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि अन्य संचालक मंडळाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही. असे असले तरी बँकेचा परवाना रद्द झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

काही माजी संचालकांकडून याबाबत दुजोरा देण्यात आला. आर्थिक परिस्थिती ढासळलेली असल्याने कारवाई झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. परवाना रद्दमुळे बँक बंद झाली असली तरी ठेवीदारांच्या ठेवी आणि वाटप करण्यात आलेली कर्ज याची सांगड घालण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

बँकेचा परवाना रद्द झाल्याची माहिती मिळताच ठेवीधारांमध्ये त्यांच्या ठेवीस घेऊन भीती निर्माण झाली आहे. शनिवारी बँकेचे कामकाज संपल्यानंतर कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर बँकेत शुकशुकाट होता.

३ मार्च २०२३ ला बँकेची आर्थिक परिस्थिती ढसाळल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रथम त्यांना सहा महिने, त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. तरीदेखील परिस्थिती सुधारली नसल्याने शेवटी शनिवारी परवाना रद्दची कारवाई झाल्याची चर्चा बँकेत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT