imprisonment Wife's brutal murder case esakal
नाशिक

चारिञ्याच्या संशयावरुन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्यास जन्मठेप

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : चारिञ्याच्या संशयावरुन पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन खून केल्याच्या आरोपावरुन मंगळने (ता. नांदगाव) येथील विजय अहिरे (३५) याला येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेपेची शिक्षा सुनावतानाच त्यास दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षाचा कारावास असा आदेश देण्यात आला आहे. जिल्हा अपर सत्र न्यायाधीश डी. डी. कुरुळकर यांनी गुरुवारी (ता.७) हा निकाल दिला.

विजय अहिरे हा पत्नी आशाबाई अहिरे (वय ३०) हिच्या चारिञ्यावर सातत्याने संशय घेत होता. ४ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी सव्वासहाच्या सुमारास त्याने राहत्या घरी पत्नीवर याच कारणावरुन गळ्यावर कोयत्याने वार करुन तिचा खून केला. या प्रकरणी विजयविरुध्द संजय पवार (रा. डोण-डिंगरगाव, ता. चाळीसगाव) यांच्या तक्रारीवरुन नांदगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अशोक पगारे यांनी सात साक्षीदार तपासले. खुनाचा गुन्हा सिध्द झाल्याने आरोपी विजयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात खटल्याची सर्व माहिती व कागदपत्र यासाठी सागर जगताप यांनी ॲडव्होकेट पगारे यांना सहकार्य केले. त्यांना उपअधिक्षक समरसिंह साळवे व पोलिस निरीक्षक रामेश्‍वर गाढे यांचे मार्गदर्शन लाभले. या खटल्याच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT