Life imprisonment latest marathi news esakal
नाशिक

दारूच्या नशेत पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत खून करणाऱ्या पतीस नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. प्रल्हाद दौलत माळी (रा. शेलूपुरी, ता. चांदवड) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २०१७ मध्ये घडली होती. (Life imprisonment to husband for murdering wife in drunkenness Nashik Crime Latest Marathi News)

पतीच्या दारूच्या व्यसनामुळे प्रल्हाद माळी (वय ३५) याच्या पत्नी मीना माळी (३२) आपल्या दोन्ही बालकांसह माहेरी कुर्णोली (ता. दिंडोरी) येथे राहत होत्या. नंतर प्रल्हाद माळीदेखील सासरी त्यांच्याकडे राहण्यास आला होता.

९ नोव्हेंबर २०१७ ला सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास दारूच्या नशेत असतानाच प्रल्हाद आणि पत्नी मीना यांच्यात वाद झाला. प्रल्हादने मीनाला शिवीगाळ करून तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले.

त्यात ती गंभीर जखमी होऊ जागीच मृत झाली. त्यानंतर प्रल्हादनेदेखील घरातच गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यास तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंडोरीचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (ता. ५) जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलाणी यांच्या न्यायालयात झाली असता फिर्यादी, पंच, साक्षीदार यांची साक्ष, तपासी अधिकारी यांनी सादर केलेले सबळ पुरावे आणि सरकारी वकील शिरीष कडवे यांनी केलेले युक्तिवाद यावरून आरोपी प्रल्हाद माळी यास जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्यास पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक संतोष गोसावी व हवालदार पवार यांनी पाठपुरावा केला. या खटल्यात मीना यांची मुलगी आणि मुलगा यांची साक्षदेखील महत्त्वाची ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT