Young woman walking home with family after surgery esakal
नाशिक

Nashik News: 22 वर्षीय तरुणीला जीवदान; घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

विजय पगारे

इगतपुरी : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या एका २२ वर्षीय आदिवासी तरुणीला मृत्यूच्या जबड्यातून घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलने परत आणले.

मुंबई, नाशिकच्या नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी या प्रकरणात हतबलता व्यक्त करून मोठ्या धोक्याची सूचना दिली होती. मात्र, तरुणीच्या नातेवाइकांचा मातोश्री हॉस्पिटलवरील पक्का विश्वास आणि सुयोग्य व्यवस्थापनामुळे तरुणीचा पुनर्जन्म झाला आहे.

संबंधित आदिवासी कुटुंबाने शस्त्रक्रियेसाठी आपले कौशल्यपणाला लावणाऱ्या सर्वांना अश्रूचे पाट वाहत कृतज्ञता व्यक्त केली. मातोश्री हॉस्पिटलमध्ये दुर्धर शस्त्रक्रिया पार पाडली. (Life of 22 year old girl Difficult surgery successful at Matoshree Hospital Ghoti Nashik News)

२२ वर्षीय आदिवासी तरुणी पोटदुखी, अंगावरून रक्त जाणे, चक्कर, हातपाय दुखण्याणामुळे दाखल झाली. सोनोग्राफी, रक्त तपासणी अहवालानुसार तिच्या पोटात एक ते दीड लिटर रक्त साठले होते.

चुकीच्या जागी गर्भधारणा किंवा इतर कारणांनी रक्तश्राव झाल्याचे निदान केले होते. प्लेटलेट्स ४९ हजार असल्याने शहापूर येथील डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया न करता तिला तत्काळ मुंबईला नेण्याचा सल्ला दिला होता.

तिच्या नाडीची गती १२० ते १३० आणि रक्तदाब ९०/६० पर्यंत पोचला होता. तरुणीला प्रचंड थकवा, अस्वस्थता वाटत होती. डॉ. धनंजय चव्हाण यांनी पुन्हा सोनोग्राफी, रक्ततपासणी केली. आलेले अहवाल अतिशय धक्कादायक होते.

प्लेटलेट्स अवघे २७ हजार आणि हिमोग्लोबिन ८.६पर्यंत होते. शस्त्रक्रिया करावीच लागणार होती. तरुणीच्या नातेवाइकांना संभाव्य सगळे धोके समजावून सांगत शस्त्रक्रियेसाठी मंजुरी घेतली गेली.

डॉ. ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी रात्री सव्वाअकराला शस्त्रक्रिया सुरू केली. ती ४० मिनिटे चालली. अतिशय सूक्ष्म नियोजनाने शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शस्त्रक्रियेसाठी लॅब तंत्रज्ञ मुंगसे, सिद्धी मेडिकलचे संचालक कुमार चोरडिया यांनी सहकार्य केले.

डॉ. हेमलता चोरडिया यांनी रात्री तीनपर्यंत तरुणीचे मनोधैर्य उंचावले. सर्व नर्सिंग, डॉक्टर व स्टाफ यांनी महत्वाची भूमिका बजावली, असे डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी सांगितले.

"कोणत्याही रुग्णाचा जीव वाचवणे प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्य आहे. रुग्णाचा विश्वास आणि श्रद्ध पक्की असल्यावर कठीण प्रसंगावर मात करता येते. या शस्त्रक्रियेतून हे सिद्ध करता आले. यामुळे आमचाही आत्मविश्वास वाढला आहे."

-डॉ. हेमलता चोरडिया, मातोश्री हॉस्पिटल, घोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold rate Today : सोनं-चांदी पुन्हा जैसे थे! दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज उसळी; सर्वसामान्यांची निराशा, जाणून घ्या आजचे भाव

MLA Amit Deshmukh : लातूरनं सांगितलंय... ‘हात म्हणतंय लातूर’; आमदार अमित देशमुख ः लातूरकरच या विजयाचे खरे शिल्पकार

BJP Falls : दिग्गज आले, सत्ता आली; पण बहुमत हुकले! सांगलीत भाजपचा वारू काठावरच थांबला

Malegaon Municipal Election Results : मालेगावात दादा भुसे ठरले किंगमेकर! शिवसेना-इस्लाम पक्षाची दमदार मुसंडी, BJP-MIM ची काय स्थिती?

Latur Municipal Election Result : लातूर म्हणतंय काँग्रेस... काँग्रेस... काँग्रेस...

SCROLL FOR NEXT