Dnyanada Darade, who was admitted due to snakebite, was discharged from the hospital with her parents and hospital staff. esakal
नाशिक

Nashik News: अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला नागाने केला दंश! मृत्युशी दिली यशस्वी झुंज

नरेश हाळणोर

Nashik News : दिवाळीसाठी मामाच्या गावाला आलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीला विषारी नागाने दंश केल्याची घटना घडली. घराच्या बाहेर असलेल्या ओट्यावर ती खेळत असताना सदरचा प्रकार घडला होता.

त्यानंतर कुटूंबियांनी तिला दोडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर संगमनेर येथे नेले. परंतु तिची प्रकृती गंभीर झाल्याने चिमुरडीला तात्काळ नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस चिमुरडी व्हेंटिलेटरवर होती.

अखेर मृत्युशी यशस्वी झुंज तिने जीवावरील धोक्याला परतवून लावले. (little girl of only three half years bitten by snake successful fight with death for 3 days Nashik News)

ज्ञानदा सागर दराडे (वय - साडेतीन वर्षे) असे या चिमुरडीचे नाव. सिन्नर तालुक्यातील नळवाडे येथील दराडे कुटूंबातील ही बोलकी चिमुरडी. दिवाळीच्या निमित्ताने ती सिन्नर तालुक्यातीलच सुरेगाव येथे मामाच्या गावी आली होती.

भाऊबीजेच्या दिवशी घरात पाहुणे आलेले. त्यावेळी ज्ञानदा ही घराबाहेरील ओट्यावर खेळत होती. ती खेळत असतानाच कुठूनतरी विषारी नाग आला आणि त्याने ज्ञानदाला दंश केला. दंश झाल्यानंतर ती घरात पळाली आणि तिने साप चावल्याचे सांगितले.

कुटूंबिय घाबरले. त्यांनी तात्काळ तिला नजिकच्या दोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात केले. तेथे प्राथमिक उपचार करून तात्काळ संगमनेर वा नाशिकला हलविण्यास सांगितले. त्यानुसार ते संगमनेरला पोहोचले. परंतु तेथील रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने त्यांनी नाशिकला धाव घेतली.

नाशिकच्या गंगापूर रोडवरील खासगी रुग्णालयात ज्ञानदाला दाखल करण्यात आले. प्रवासात बराच वेळ गेल्याने ज्ञानदाची प्रकृती खालावली होती. तिला तात्काळ व्हेंटिलेटर लावण्यात आले. स्नेकबाईट प्रतिबंधक लस देण्यात आले.

तीन दिवस ज्ञानदा व्हेंटिलेटरवर होती. डॉ. अभिजित सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. यात त्यांना यश आले. ज्ञानदाला नऊ दिवसांनंतर गुुरुवारी (ता.२३) डिस्चार्ज देण्यात आला.

मात्र या आठवडाभरात दराडे कुटूंबियांची झोप उडाली होती. दराडे दाम्पत्याची ज्ञानदा ही एकुलती एक कन्या होती. दरम्यान, ज्ञानदाला दंश केलेल्या नागाला गावातील सर्पमित्रांनी पकडले होते. नंतर त्यास जंगलातील अधिवासात सोडून देण्यात आले.

"ज्ञानदाला हॉस्पिटलमध्ये आणले, त्यावेळी तिची प्रकृती खालावलेली होती. विषारी नागाने दंश केलेला असल्याने तिच्या जीवाला धोका वाढला होता. परंतु तात्काळ उपचारामुळे ज्ञानदाचा जीव वाचविता आला."- डॉ. अभिजित सांगळे, साफल्य हॉस्पिटल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT