civil hospital esakal
नाशिक

Nashik News: ‘त्या’ प्रकरणाचा डीन काही खुलासा देईना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा रुग्णालयामध्ये जळीत वार्डातील जिवंत रुग्णाला प्रशिक्षणार्थी डॉक्टरने मयत घोषित करण्यात आल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. सुशीलकुमार झा यांना एकदा नव्हे दोन वेळा पत्र देत खुलासा मागविला होता. (living patient declared dead by trainee doctor at civil hospital no action from dean of medical college nashik news)

परंतु डीन डॉ. झा यांच्याकडून कोणतेही उत्तर अद्यापपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सकांना मिळालेले नाही. यावरून वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रणेची रुग्णसेवेसंदर्भात गांभीर्य नसल्याचेच स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.

अशोक स्तंभ परिसरात राहणारे नितीन मोरे यांनी गेल्या २२ मे रोजी स्वतःला पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले होते. यात ते ९३ टक्के गंभीररीत्या भाजल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील जळीत वॉर्डमध्ये दाखल केले होते.

गुरुवार, २५ मे रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मोरे यांची कोणतीही हालचाल होत नसल्याने वॉर्डातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरने ईसीजी रिपोर्ट काढून मोरे यांना वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना न विचारताच मृत घोषित केले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तोच रुग्ण दीड तासाने जिवंत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सिव्हिलमधील पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा गलथानपणा उघडकीस आला होता. यासंदर्भात ‘सकाळ’ मधून काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते.

त्याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. सुशीलकुमार झा यांना पत्र देत चौकशी करून खुलासा मागविला होता. यासंदर्भात डॉ. थोरात यांनी दुसऱ्यांदा पत्र दिले.

परंतु अद्यापही डीन डॉ. झा यांच्याकडून चौकशी करून अहवाल आलेला नाही. यावरून वैद्यकीय महाविद्यालयीन यंत्रणा रुग्णसेवेबाबत गंभीर नसल्याचेच स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT