नाशिक : यंदा पावसाने अधिकच वाट बघायला लावल्याने इगतपूरी तालुक्यात पावसाची ओढ लागली होती. मात्र या आठवड्यात वरुणराजाची चांगलीच कृपा झाल्याने कडवा धरण भरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. जलपूजनाला विशेष महत्व असल्याने परिसरातील नागरिक व सरपंच यांनी कडवा धरणाचे बुधवारी (ता. 19)पूजन केले.
दारणा समुहातील हे मोठे धरण
बुधवारी (ता. 19) सकाळी 1688 दशलक्ष घनफूट क्षमतेचे कडवा धरण शंभर टक्के भरले आहे. इगतपूरी तालुक्यातील दारणा समुहातील हे मोठे धरण आहे. गतवर्षी या कालावधीत धरणाचा साठा 99 टक्के साठा होता. या तालुक्यात सरासरी 994.37 मीलीमीटर पाऊस होतो. आजपर्यंत तालुक्यात या महिन्यात एक हजार 159 मिलीमिटर असा ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सरासरी 117 टक्के पाऊस झाला. जून ते सप्टेबर या कालावधीत या तालुक्यातील पावसाची सरासरी तीन हजार 557 मि. मि. आहे. स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या पाटबंधारे प्रकल्पांनी अपेक्षीत संचय क्षमता पूर्ण केल्यावर लोकप्रतिनिधी, नेत्यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्याचा प्रघात आहे.
1 जून ते 10 ऑगस्ट या कालावधीत 2676 मि.मि. पाऊस
नाशिक जिल्ह्यातील धरणा भरण्यासा सुरवात झाल्याने कडवा धरणाच्या वरच्या बाजूच्या भावली धरणाचे जलपूजन यापूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले होते. हे धरण मात्र खालच्या भागात असल्याने अजुन त्यात अपेक्षीत जलसाठा झाला नव्हता. मागीलवर्षी येथे चार हजार 221 मि.मि. पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा 1 जून ते 10 ऑगस्ट या कालावधीत 2676 मि.मि. पाऊस झाला आहे. विलंबाच्या पावसाने धरण भरण्यास देखील विलंब झाला.
धरण भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता दूर झाली आहे. त्यामुळे पक्ष, संघटना बाजूला ठेवत येथील शेतकरी व सरपंचांनी एकत्र येत आज जलपूजन केले. यानिमित्ताने परिसरातील सर्व सरपंचांत एकोपा निर्माण झाल्याने ग्रामस्थांनि याबाबत समाधान व्यक्त केले.
हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?
(संपादन - किशोरी वाघ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.