येवला (जि. नाशिक) : हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेली अक्षयतृतीया (Akshaytrutiya) व मुस्लिम बांधवांची रमजान ईद (Ramzan Eid) या पार्श्वभूमीवर बाजारात आलेल्या आंब्यांच्या विक्रीला लॉकडाउनचा फटका बसत आहे. सणासुदीला मागणी असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आंब्याची खरेदी करून ठेवली आहे. मात्र विक्रीला वेळेचे बंधन घातल्याने खरेदी करून ठेवलेले लाखोंचे आंबे विक्री कसे करावे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. व्यावसायिकांचे होणारे आर्थिक नुकसान पाहता आंबे विक्रीसाठी वेळ वाढवण्याची मागणी विक्रेते करत आहेत.(lockdown has caused huge financial losses to mango traders)
अक्षयतृतीयेचा मुहूर्त, पितृपक्ष आणि रमजानचा महिना सुरू असल्याने विविध प्रकारचा आंब्यांची आवक सुरू आहे. कोरोनामुळे राज्य लॉकडाउन आहे. यामुळे महाराष्ट्रातील हजारो टन हापूस आंब्याची विदेशात निर्यात होऊ शकली नाही. हापूस आंबा रत्नागिरी, देवगड, नाशिक, सांगली अशा विविध जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. तो आंबा पडून आहे. सध्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून बदाम, लंगडा, केशर अशा मोजक्या वाणाची आंबे बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. हे आंबे परराज्यातून येत असल्याने ग्राहक आंबे खरेदीसाठी धजावत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाजारातील आंबे खाण्यावर बहुतेक ग्राहकांची इच्छा नसली तरी सणामुळे ग्राहक आंब्याकडे आकर्षित होत आहेत.
दोन वाजेपर्यंत विक्रीला परवानगी मिळावी..
शहरात मोजक्या ठिकाणीच हापूस आंबा उपलब्ध आहे. त्यामुळे दोनशे रुपये किलोने हापूसची विक्री सुरू आहे. बदाम- ७०-८०, केशर १०० ते १५०, शेंदरी गावरान शंभर रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. अक्षयतृतीयेला नेहमी आंब्याची विक्री जास्त असते. शिवाय रमजानदेखील सुरू आहे. त्यातच प्रशासनाने सकाळी अकरापर्यंत विक्रीला परवानगी दिली असून, घरपोच विक्रीचा आग्रह धरला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबे विक्री अशक्य आहे. त्यामुळे स्टॉल मांडून दोनपर्यंत आंबे विक्रीला परवानगी मिळावी, अशी अपेक्षा या विक्रेत्यांची आहे.
अक्षयतृतीया व रमजानच्या पार्श्वभूमीवर सुमारे एक लाखाच्या आंब्यांची खरेदी करून ठेवली आहे. लॉकडाउन सुरू असल्याने आंबे विक्री करता येत नसल्याने प्रशासनाने पूर्ण वेळ अथवा सणासुदीच्या दिवसात दोनपर्यंत स्टोलवर विक्री करू द्यावी.
- राजूशेठ निंबूवाले, आंबा व्यावसायिक, येवला
(lockdown has caused huge financial losses to mango traders)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.