grapes farm.jpg 
नाशिक

#Lockdown : 'द्राक्षांचे मनुके होण्याच्या मार्गावर!'...व्यापाऱ्यांनीही फिरविली पाठ; शेतकरी हवालदील

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिक रोड पूर्व) कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने द्राक्षबागायतदार प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातच व्यापाऱ्यांनी पाठ फिरविली अन्‌ बाजारपेठाही बंद असल्याने द्राक्षांचे मनुके होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे.  

व्यापाऱ्यांनी ठरलेले व्यवहार केले रद्द 

दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांना कधी लहरी हवामान, तर कधी भाव नसल्याने कर्जाची परतफेड करणे मुश्‍कील होत आहे. यंदा कोरोनामुळे उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार असल्याचे चित्र दिसते. व्यापाऱ्यांनी ठरलेले व्यवहार रद्द केले आहेत. शेतकऱ्यांची द्राक्षे बागेतच आहेत. सर्वत्र बंद असल्याने त्यांना स्थानिक बाजारपेठेत द्राक्षे विक्रीसाठी नेता येत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. 

शासकीय प्रयत्न तोकडे 

जिल्हाधिकारी कार्यालयात द्राक्ष उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि एक्‍स्पोर्ट कंपनीच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक झाली. यात बाजारपेठेत द्राक्ष उपलब्ध करण्यासाठी काही उपाययोजना ठरविल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याचा खूप काही परिणाम झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

विदेशात पाठविणाऱ्या दर्जाचा माल वेलीवरच आहे. व्यापारी नाही, मजूर नाही, कुटुंबातील सर्वच सदस्यांना काम करावे लागते आहे. मनुक्‍याच्या व्यापाऱ्यांचीही प्रचंड विनवणी करावी लागते. वेलीवर माल ठेवलाच, तर पुढच्या वर्षी पीक हाती येणार नाही. - कैलास माळोदे, संचालक सह्याद्री फार्मर प्रोडक्‍ट कंपनी, संचालक, महाराष्ट्र द्राक्षबागायत संघ पुणे 

यंदा घरघालू धंदा आहे. चाळीस रुपयांचा माल पाच ते सहा रुपयांनी द्यावा लागतो. मुद्दलही वसूल होणार नाही. त्यामुळे कर्ज फेडणार कसे, असा प्रश्‍न आमच्या समोर निर्माण झाला आहे. - शंकर नवले, शेतकरी  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: कर्जाच्या डोंगरामुळे तरुण शेतकऱ्याने दिला जीव

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT