Voters List esakal
नाशिक

Loksabha Election: नवीन मतदारयादीची 22 जानेवारीला प्रसिद्धी

त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ होण्यास या मुदतीचा फायदा होईल.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधारित मतदार यादी ५ जानेवारी २०२४ ऐवजी २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ होण्यास या मुदतीचा फायदा होईल. (Loksabha Election Publication of new voter list on January 22 nashik)

निवडणूक शाखेतर्फे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात नवमतदारांच्या नोंदणी केली जात आहे. मतदार यादीत समाविष्ट नावांमधील दुरुस्ती व मतदार यादीत नाव नसेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

आयोगाच्या निर्देशानुसार पाच जानेवारी रोजी एकाच वेळी जिल्ह्यातील १५ मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येणार होती. परंतु, आयोगाने नव्याने आदेश काढत यादीच्या प्रसिद्धीला मुदतवाढ दिली आहे.

नवीन आदेशानुसार १२ जानेवारीपर्यंत मतदार यादीवरील दावे आणि हरकती निकाली काढता येणार आहेत. तर १७ तारखेला मतदार यादीची तपासणी व छपाई केली जाईल. तसेच २२ जानेवारीला अंतिम मतदार यादींची प्रसिद्धी करायची आहे. त्यामुळे मतदार नोंदणीसाठी निवडणूक शाखेला पंधरा दिवसांचा अधिक कालावधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

सायलीला आठवणार तिचा भुतकाळ! अर्जुनच्या बालपणींच्या आठवणीमुळे सायलीची स्मृती परत येणार? ठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट

Ration Card : रेशनकार्डमधून १.१७ कोटी लोकांची नावे वगळणार, केंद्राने राज्यांना पाठवली यादी; तुमचं नाव तर नाही ना ?

Pune Traffic : सिंहगड रस्तावासीयांना पुन्हा मनस्ताप; पाऊस, प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT