CNG filling  esakal
नाशिक

नाशिक : CNG फिलींग, रात्रीच्या रांगा अन् तीनशे रूपये...

सकाळ डिजिटल टीम

प्रतिक जोशी : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : पेट्रोल, डिझेलचे गगनाला भिडलेले भाव, यामुळे नागरिकांना वाहने चालविणे कठीण होऊन बसले आणि अशातच शहरात सीएनजी (CNG) गॅसचे पंप सुरू झाले. मात्र, त्यांची संख्या अल्प असल्याने सीएनजी भरण्यासाठी पंपाबाहेर रांगेमध्ये नागरिकांना तासनतास उभे राहावे लागते. शहरातील नागरिकांना होणाऱ्या या असुविधेतून शहरात एक नवीन रोजगाराला चालना मिळाली आहे.

रांगेच्या समस्येतून नव्या रोजगाराचा जन्म

शहरात सीएनजी वाहनांची संख्या वाढली त्यामानाने सीएनजी पंपांची संख्या मात्र पूरक नाही. त्याचबरोबर सीएनजी भरण्याच्या प्रक्रियेलादेखील बराच वेळ लागतो आणि त्यामुळेच शहरातील सीएनजी पंपाबाहेर लांबच लांब रांगा लागतात. अशातच कोरोनामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी शोधणाऱ्या वर्गाने या समस्येचा उपयोग करत नागरिकांच्या गाडीत सीएनजी भरून आणण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे.

असा चालतो व्यवसाय

ज्यांच्याकडे सीएनजीचे वाहन आहे, परंतु गर्दीत सीएनजी भरण्यास वेळ नाही अशा नागरिकांना शहरातील काही चालक वर्ग गाडीत सीएनजी भरून आणून देतात. अनेकदा गाडीत सीएनजी भरून देता का, अशी मागणी मालकांकडून होते, तर काहीवेळा चालक स्वतः ग्राहकाच्या शोधात असतात. हे चालक गाडी ताब्यात घेऊन रात्री सीएनजी पंपावर रांगेत सात ते आठ तास प्रतिक्षा करून सीएनजी भरतात. त्यानंतर गाडी पुन्हा मालकांच्या स्वाधीन करतात. एका गाडीत सीएनजी भरून आणण्यासाठी तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत आकारणी केली जाते. साधारण एक चालक दिवसभरातून एक किंवा त्यापेक्षा अधिक गाड्यांमध्ये सीएनजी भरून चांगला नफा कमावतात. समस्येतून रोजगाराचा झालेला हा जन्म सध्या नाशिकमध्ये ट्रेंडीग टॉपिक म्हणून चर्चेत आहे.


''आधी बदली चालक म्हणून काम करीत. त्यासाठी बाहेरगावी प्रवास करावा लागत होता, परंतु आता शहरात सीएनजी भरून आणण्याचे काम मिळत असल्याने शहरातल्या शहरात कमी मेहनतीत चांगला रोजगार मिळतो आहे.'' - हर्षल दुशिंग, वाहनचालक

''ज्या नागरिकांना रांगेत उभे राहून सीएनजी भरण्यास वेळ नाही, असे लोक आम्हाला फोन करतात आणि सीएनजी भरून आणण्याची विनंती करतात. काम कुठलीही करायचंच आहे, आणि यातूनही चांगले पैसे मिळतात. त्यामुळे आम्ही आनंदाने हे काम करतो. आमच्यासाठी हा नवीन रोजगार आहे.'' - किशोर जोशी, चालक


''टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स कंपनी चालवताना ग्राहकांच्या येणाऱ्या प्रत्येक गरजेला सहकार्य करणे आमचे काम आहे. सीएनजी भरायचा आहे, त्यासाठी चालक उपलब्ध करून द्या अशी कोणी विनंती केल्यास त्यांना जरूर मदत करतो. यातून चालकाला ३०० ते ५०० रुपयांपर्यंत पैसे मिळतात.'' - नितीन बांडे - संचालक, पुष्पांजली टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur President’s Rule Ends: वर्षभरानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात ; युमनाम खेमचंद सिंह घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!

U19 World Cup: भारताविरुद्ध सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या दोघांची शतकं, विक्रमही नावावर अन् संघाच्या ३०० धावाही पार...

Horoscope : 150 वर्षानंतर उद्या बनतोय खास योग! 'या' 5 राशी ठरणार लकी; धनलाभ, कामातली अडचण होईल दूर, वैवाहिक जीवनाला नवे वळण

Rise of Online Education : भारतातील ऑनलाईन शिक्षणाचा उदय : एमबीए आणि काम करणाऱ्या  व्यवसायिकांसाठीचा नेमका अर्थ 

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपावर भाजपचे वर्चस्व! हिमगौरी आहेर-आडके यांचा अर्ज दाखल, पण 'ठाकरे' गटाच्या एन्ट्रीने लढत होणार

SCROLL FOR NEXT