crime esakal
नाशिक

पोलिस असल्याचे भासवून भामट्यांकडून शिर्डी महामार्गावर नाकाबंदी

तोतया पोलीस बनून इंट्रीच्या नावाखाली वाहनधारकांच्या लुटीचा पद्धतशीर डाव आखल्याचे बोलले जात आहे.

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर -शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरवाडी शिवारातील नियोजित टोल प्लाझा जवळ रात्रीच्या वेळी पोलीस असल्याची बतावणी करत कागदपत्र तपासणी व चौकशीच्या नावाखाली थांबवून वाहन चालकांकडून पैशांची मागणी करणाऱ्या चौकडी पैकी एकास पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्याचे तिघे साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. (Latest Marathi News)

गौरव देविदास घोटेकर (23) रा. शहा असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दिनांक 12 रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावीजवळ असलेल्या नियोजित टोल प्लाजा च्या ठिकाणी थांबून गौरव व त्याच्यासोबत आणखी तिघेजण दोन दुचाकी रस्त्यात आडव्या उभ्या करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबवत होते. वाहने थांबवल्यावर चालकांकडून कागदपत्रांची मागणी करतानाच आम्ही पोलिस असून वाहनांच्या तपासणीसाठी नाकाबंदी केली असल्याचे ते सांगत होते. पुढे थांबवलेल्या तीन वाहन चालकांकडून त्यांनी काही रक्कम घेऊन सोडून दिल्याचा प्रकार पाठीमागे असलेल्या एका वाहन चालकाने बघितला.

त्यालाही थांबवत या चौघांनी त्याच्याकडे इंट्री म्हणून पाचशे रुपयांची मागणी केली व पैसे न दिल्यास तुमच्या वाहनास दोन हजार रुपये ऑनलाईन दंड आकारला जाईल असे सांगितले. तुम्ही ड्रेसवर नाही व तुमच्या सोबत अधिकारी कोण आहे असे वाहन चालकाने विचारल्यावर आम्ही साध्या गणवेशातील पोलीस आहोत व आमचे साहेब समोरच काही अंतरावर थांबले आहेत असे त्यांनी सांगितले. संशय आल्याने त्यांना बोलण्यात गुंतवत ठेवत या वाहन चालकाने पोलीस नियंत्रण कक्षाशी 100 नंबर वर संपर्क साधत सदर प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून वावी पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकास सुचित करण्यात आल्यावर पोलीस पथकाने तात्काळ टोल प्लाजा जवळ धाव घेतली असता तेथे कथित नाकाबंदीचा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले.

मात्र, पोलिसांचे खरे वाहन येत असल्याचे पाहून या चौघांनी पळ काढला. पोलिसांचे वाहन आल्यावर काही वाहन चालकांनी देखील त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या गौरव घोटेकर यास ताब्यात घेतले. तर इतर तिघे मात्र अंधाराचा फायदा घेऊन बाजूच्या शेतांमधून पसार झाले. त्यांच्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

गौरव कडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर नथू कांदळकर व रमण सुलाखे दोघे रा. शहा , तर राम शेळके रा मिरगाव या तिघा साथीदारांची नावे सांगत आम्ही बनावट पोलीस असल्याचे सांगून वाहन चालकाकडून दोनशे ते पाचशे रुपये उकळत असल्याची कबुली दिली. वावी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार असलेल्या तिघांच्या शोधात आहेत.

दिवस-रात्र लुटीचाच डाव...

शिर्डी महामार्गावरील वावीच्या प्रस्तावित टोलनाक्याजवळ गेल्या महिना दीड महिन्यापासून महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलिसांचे पथक तळ ठोकून असते दिवसभर या पथकाकडून जाणाऱ्या येणाऱ्या विशेषतः मुंबई विभाग व गुजरात कडील वाहनांना तसेच इतर खाजगी प्रवासी वाहनांना थांबवून चिरीमिरीसाठी त्यांची लूटमार करत असतात. या प्रकारामुळे शिर्डीकडे प्रवास करणारे नियमित वाहनधारक वैतागले आहेत. याच पथकाचे अनुकरण करत गौरव घोटेकर व त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी तोतया पोलीस बनून इंट्रीच्या नावाखाली वाहनधारकांच्या लुटीचा पद्धतशीर डाव आखल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT