Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : कंपनीत शिरून 4 कोटींच्या मशिनरीची लूट; सातपूर एमआयडीसीतील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सातपूर औद्योगिक वसाहतीत कंपनीस करारानुसार दिलेली जागा खाली करण्यास सांगत जागामालक टोळक्यासह कंपनीत शिरले आणि गुंडगिरी करत लूटमार केल्याची घटना घडली. (Looting machine worth 4 crores in satpur midc nashik crime news )

संशयित गुंडांनी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करीत तब्बल चार कोटींची रुपयांची मशिनरी लुटून नेली. याप्रकरणी जबरी लुटीसह विनयभंगाचा गुन्हा सातपूर पोलिसात दाखल करण्यात आला असून, सात संशयितांना अटक करण्यात आली आहे.

केशरसिंग शेखावत (३०), रोहित राजेश गोरण (२८), रितेश राकेश बुरट (२५), पंकज मदनलाल लोट (३२), सूरज शभुजी टाक (३२), दिग्विजय गोवर्धन सिंग (३८) व अजय इंटरलालजी लोट (३६), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. भाऊसाहेब ठाणसिंग गिरासे (रा. वडाळा- पाथर्डी रोड) यांची सातपूर औद्योगिक वसाहतीत हर्षिता इलेक्ट्रिकल्स व केबीबी नावाची कंपनी आहे.

या कंपनीत फॅब्रिकेशन व त्यासंबंधी लागणारी मशिनरी बनविण्याचे काम केले जाते. त्यासाठी त्यांनी ३ कोटी ८५ लाख रुपयांची अत्याधुनिक मशिनरी कार्यान्वित केली आहे. दरम्यान, गिरासे यांनी कंपनी स्थापन करताना लागणारी जागा संशयितांच्या परस्पर संमतीने तसेच करारानुसार घेतली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, मूळ जागामालक संशयित केशरसिंग शेखावत यांनी गिरासे यांना कंपनी लवकरात लवकर खाली करण्यासाठी काही दिवसांपासून दबाव टाकला. त्याला गिरासे यांनी विरोध केला असता, संशयितांनी संगनमताने गुरुवारी (ता. १५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास टोळक्याला हाताशी धरुन कंपनीत प्रवेश केला. हातात धारदार हत्यारे मिरवत संशयितांनी काम करणाऱ्या महिला सिक्युरिटी गार्डला व अन्य कर्मचाऱ्यांना धमकी देत मारहाण केली.

सर्वांचे मोबाईल जबरीने हिसकावून घेत कंपनीतील सीसीटीव्ही व महागड्या मशिनरीची तोडफोड केली. विशेष म्हणजे संशयितांनी कंपनीत घुसण्याचे पूर्वनियोजन करून क्रेन व अन्य वाहने सोबत आणली होती. याच क्रेनच्या मदतीने कंपनीतील मशिनरी बाहेर काढून त्यातील काही मशिन व इतर वस्तू दुसऱ्या वाहनात टाकून जबरी चोरी केली.

सदरचा प्रकार रात्री साडेदहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु होता. घटनेची माहिती कळताच शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त, विभागाचे सहायक आयुक्त व सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास महिला उपनिरीक्षक अश्विनी उबाळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Lift Accident: १२ वर्षांचा पोटचा गोळा गेला, आई पोरकी झाली... पिंपरीत मुलगा लिफ्टमध्ये कसा अडकला? काय घडलं होतं?

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

Latest Marathi News Live Update : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

100 Years Of RSS: रेशीम बागेत चैतन्य अन्‌ उत्साह; संघ शताब्दी विजयादशमीला हजारो स्वयंसेवकांची गर्दी

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजाने मोडला MS Dhoni चा रेकॉर्ड! आता 'हिटमॅन'चा विक्रम संकटात; ध्रुव जुरेलसह शतकी भागीदारी

SCROLL FOR NEXT