Swami Hariharanand, Br. Nageshwaranand and Shiva Angulgaonkar etc. while handing over the Kalash to the General Secretary of Sriram Mandir Trust Champat Rai. esakal
नाशिक

Nashik: महाराष्ट्रातील 35 हजार विहिरींच्या पाण्याने अयोध्येत प्रभू श्रीरामाचा होणार जलाभिषेक!

या पाण्याचे कलश अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

मुकुंद पिंगळे

नाशिक : अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण देशभरातील अनेक भाविक भक्त अनुभवणार आहेत.

याच कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातून ३४,९९९ शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी संकलित करण्यात आले.

त्यांनतर या पाण्याचे कलश अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या पाण्याच्या जलाभिषेकाद्वारे शेतकऱ्यांच्या भाव समर्पित होणार आहे. (Lord Rama will be baptized in Ayodhya with water from 35 thousand wells in Maharashtra Kalash reaches Ayodhya Nashik)

जनार्दन स्वामींचे ३४ वे पुण्यस्मरण नुकतेच नाशिकमध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना एका गावातून किमान ३४ शेतकऱ्यांच्या विहिरीतून पाणी आणण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार जवळपास १ हजाराहून अधिक गावातून हे कलश आले. त्यासोबत भाविकांनी नाण्याचे कलश आणले होते. हे कलश ओझर मिग(ता.निफाड) येथील जनशांतीधाम आश्रमात जमा करण्यात आले होते.

हे कलश मंगळवारी (ता.९) रोजी भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक काढून मार्गस्थ झाले होते. महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमीय संत स्वामी हरिहरानंद, ब्र.नागेश्वरानंद,भक्त परिवारातील ज्येष्ठ सदस्य शिवा अंगुलगावकर यांच्या हस्ते हे कलश पाठविण्यात आले होते.

पंचवटी ते अयोध्या या मार्गात अनेक भाविकांनी त्याचे स्वागत केले. शनिवारी(ता.१३) कलश पोहोचल्यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे न्यासाच्या कार्यालयात हस्तांतरित करण्यात आले. त्यानुसार कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या पाण्याने मूर्तीचा जलाभिषेक होणार आहे.

पंचवटी ते अयोध्या जलकलश यात्रा

प्रभू श्रीराम १४ वर्षे नाशिकमध्ये वनवासात राहिल्याने नाशिकची रामभूमी अशी ओळख आहे. येथे दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्यामुळे विशेष अध्यात्मिक ओळख असलेल्या नाशिकमधील पंचवटीमधून हे कलश अयोध्येपर्यंत पोचले आहेत.

हे सर्व कलश प्रामुख्याने नाशिक, नगर, छञपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, जालना, पुणे, ठाणे, जालना, परभणी आदी जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी आणले होते.

जनार्दन स्वामी यांनी कर्मयोगाची शिकवण देताना कृषी, गोसेवा,शिक्षण, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण अशा क्षेत्रात मोठे काम केले आहे. हीच परंपरा शांतीगिरी महाराज पुढे नेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT