Loss of millions of rupees to farmers due to short circuit Nashik Marathi news 
नाशिक

शॉर्टसर्किटमुळे कष्टाने वाढवलेली शेकडो झाडे खाक! शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

गौरव परदेसी

खेडभैरव (जि. नाशिक)  : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अधरवड येथे सोमवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. शेतकरी मोहन बऱ्हे यांनी शेतात लावलेली कलम आंब्याची १००, जांभळीची १५० व कडुलिंबाची २५ झाडे जळून आगीत भस्मसात झाली आहेत. जनावरांसाठी साठवून ठेवलेले वैरणही आगीत खाक झाले आहे. 

विशेष म्हणजे शेतकरी बऱ्हे यांनी कार्यकारी उपअभियंता महावितरण कंपनीला निवेदन देऊन शेतीसाठी व शेतजमीन सपाटीकरणासाठी अडथळा येत असल्याने त्यांच्या शेतातून टाकेदला गेलेली मेन लाइन बाजूला हलवून रस्त्याच्या कडेने टाकण्यासाठी विनंती केली होती. त्याचप्रमाणे २२ ऑगस्ट २०१९ लादेखील निवेदन देऊन शेतातील लाइन शेतीची मशागत व शेततळे खोदण्यास अडथळा येत असल्याची कल्पना देऊन रस्त्याच्या कडेने टाकण्याची विनंती केली होती. तरीही, आजपर्यंत त्याची दखल घेतली गेली नाही. शेतात लावलेली आंब्याची, जांभळीची व कडुलिंबाची झाडे कष्टाने वाढविली होती. त्यांना टँकरने पाणी घालून वाढविले होते. आगीने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. बाजूलाच ठेवलेला जनावरांचा चारा, गवताच्या पेंढ्यादेखील जळून गेल्याने प्रचंड नुकसान झाले. उद्या जनावरांना खायला काय द्यायचे, हा पेच त्यांना पडला आहे. आगीमुळे मोहन बऱ्हे, रामकृष्ण बऱ्हे, भास्कर बऱ्हे, अजय बांडे, नितीन परदेशी आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

महावितरण कंपनीला दोन वेळेस निवेदन देऊन विद्युत लाइन रस्त्याच्या कडेने टाकण्याबाबत विनंती केली होती; परंतु अजूनही स्थिती जैसे थे आहे. आंबा, जांभूळ व कडुलिंब आदी झाडांना टँकरने पाणी घालून जगविले होते. सर्व जळून खाक झाले असून, नुकसानभरपाई महावितरण कंपनीकडून मिळावी. 
-मोहन बऱ्हे, नुकसानग्रस्त शेतकरी, अधरवड 

घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविला असून, विद्युत निरीक्षक पुढील कार्यवाही करतील. 
-तुषार राणे, अभियंता, विद्युत वितरण कंपनी, घोटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT