nashik road railway station.jpg 
नाशिक

पावणेदोन लाखांचे दागिने रेल्वे फलाटावर तसेच पडून होते...सीसीटिव्हीत पाहिले तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोडला रेल्वेस्थानकावर मंगळवारी (ता.10) फलाट एकवर विसरलेली एक लाख 71 हजारांचा ऐवज असलेली बॅग रेल्वे पोलिसांनी सुखरूप संबंधितांच्या हातात सोपवली. 

असा घडला प्रकार...
जेल रोड भागातील रहिवासी दत्तात्रय येनपुरे (वय 66) मंगळवारी (ता.10) मनमाडला जाण्यासाठी रेल्वे फलाटावर गोदावरी एक्‍स्प्रेसची वाट पाहात होते. एक्‍स्प्रेस आल्यानंतर गाडीत बसण्याच्या गडबडीत ते त्यांची दागिन्यांची बॅग फलाटावर विसरले. बॅग विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी बॅगेचा शोध घेत हवालदार संतोष उफाडे, पोलिस शिपाई महेश सावंत, आरपीएफ विजय जाधव, कैलास बोडके, गोपनीय विभागाचे सचिन सानप आदींनी शोधाशोध करीत सीसीटीव्हीद्वारे माग काढीत बॅग पुन्हा सायंकाळी येनपुरे यांच्या ताब्यात दिली. बॅगेत 19.98 ग्रॅमची सोन्याची चेन, 9.780 ग्रॅम सोन्याच्या पुतळ्या, 9.970 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 4.550 ग्रॅमचे सोन्याचे मणी, असा सुमारे 4 तोळे 451 ग्रॅमचा सुमारे एक लाख 72 हजारांचा ऐवज परत मिळवून दिला. प्रभारी अधिकारी अशोक जाधव यांच्या उपस्थितीत येनपुरे कुटुंबाला ती बॅग देण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT