loudspeaker esakal
नाशिक

दहा प्रमुख उत्सवांसाठी रात्री १२ पर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी!

विनोद बेदरकर

नाशिक : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशान्वये ध्वनिक्षेपक (loudspeaker) वापराबाबत सूट जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने (state government) जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. या पार्श्वभूमीवर वर्षात जास्तीत जास्त १५ दिवस निश्चित करून सकाळी सहापासून ते रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर वाजविण्याची मुभा देण्यात आली आहे

दहा प्रमुख उत्सवांसाठी रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक परवानगी

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रणाच्या सुधारित नियमानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी जिल्ह्याच्या गरजेनुसार वर्षात जास्तीत जास्त १५ दिवस निश्चित करून सकाळी सहापासून ते रात्री बारापर्यंत मुभा देण्यात आली आहे. यानुसार जिल्हास्तरावर २०२२ या वर्षातील ध्वनीची विहित मर्यादा राखून सण-उत्सवांच्या काळात दहा दिवसांसाठी रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक सुरू ठेवता येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षातील जिल्ह्यातील दहा प्रमुख उत्सवांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी सहापासून ते रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर्स वाजविण्याची मुभा असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली

वर्षातील दहा उत्सव असे

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव १९ फेब्रुवारी २०२२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव १४ एप्रिल २०२२

गणपती उत्सव ८ सप्टेंबर २०२२

नवरात्रोत्सव उत्सव (दुर्गाष्टमी) ३ ऑक्टोबर २०२२

नवरात्रोत्सव उत्सव (दसरा) ५ ऑक्टोबर २०२२

ईद-ए-मिलाद ९ ऑक्टोबर २०२२

दिवाळी (लक्ष्मीपूजन) २४ ऑक्टोबर २०२२

ख्रिसमस नाताळ २५ डिसेंबर २०२२

नववर्ष स्वागत ३१ डिसेंबर २०२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Y Patil Last Rites Mahadevrao Mahadik : डी. वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी महादेवराव महाडिकांची उपस्थिती; सतेज पाटील-महाडिकांची भेट

IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे काउंटडाऊन सुरू! कुठे पाहता येणार सामने लाईव्ह? पाहा संपूर्ण डिटेल्स

Koyna Dam : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पाण्याची आवक घटली, 92.49 टीएमसी साठा

Kia Sorento: फॉर्च्यूनरला टक्कर! कियाची पहिली हायब्रिड SUV 'Sorento' लाँचसाठी तयार; प्री-बुकिंग सुरू!

Marathi Live Updates News: राज ठाकरे यांनी घेतले डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

SCROLL FOR NEXT