Love Story esakal
नाशिक

Nashik: ..तरच विवाह नोंदणी दाखला! प्रेमविवाहाला पालकांची परवानगी आवश्यक; सायखेडा ग्रामपंचायतीचा ठराव

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : प्रेमविवाह करायचा असेल, तर आई-वडिलांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी कार्यालयानेही परवानगी देऊ नये, असा ठराव सायखेडा ग्रामपंचायतीने केला आहे.

प्रेमविवाहात अट टाकणारी आणि त्यासंबंधी ठराव पारित करणारी सायखेडा ग्रामपंचायत बहुधा राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. माजी सरपंच भाऊसाहेब कातकाडे यांनी याबाबत पंचायतीला पत्र दिले होते. त्यावर ग्रामसभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला. (Love marriage requires parental permission Resolution of Saykheda Gram Panchayat nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या ठरावानुसार आई-वडिलांच्या परवानगीचे पत्र असेल, तरच विवाहाची नोंद ग्रामपंचायती दप्तरी करण्यात येईल. त्यांनाच विवाह केल्याचा दाखला मिळेल, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.

या ठरावाची प्रत तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. आदर्श कुटुंबपद्धती अमलात यावी, यासाठी आता सरपंच गणेश कातकाडे, सुधीर शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन त्यांना साकडे घालणार आहे. या ठरावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

"प्रेमविवाह करताना पालकांची परवानगी असणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य नाही. प्रत्येक सज्ञान व्यक्तीला त्यांनी निवडलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार आहे. मग ती व्यक्ती कोणत्याही जाती धर्मातील असली, तरी तसा अधिकार आपले संविधान प्रत्येक व्यक्तीला देते. सायखेडा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी अनिवार्य असण्याचा ठराव पूर्णपणे घटनाबाह्य आहे."-के. अभिजित, राइट टू लव्ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT