Nashik  sakal
नाशिक

नाशिक गारठलं! निफाडमध्ये आज तब्बल 6 डिग्री सेल्सियस तापमान

नाशिककरांना आता चांगलीच हुडहुडी भरली आहे.

सुधीर काकडे

नाशिकमध्ये (Nashik) 7.1 आणि निफाड (Niphad) मध्ये 6.1 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाली आहे. त्यामुळे आता नाशिक चांगलंच गारठलं असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. जिल्हयात रात्रीपासून गार वारा वाहतोय. 14 ते 15 अंश सेल्सिअस किमान तापमानावरून पारा खूपच खाली घसरल्यानं आरोग्याच्या तक्रारीत भर पडणार आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी घ्यावी लागणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली असून, परतीच्या पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. एकीकडे कोरोना आणि ओमिक्रॉनने चिंता वाढवलेली असताना दुसरीकडे वातावरणात होणाऱ्या अशा बदलांमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या येण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील पश्‍चिमी चक्रावात, अरबी समुद्रातून होत असलेला बाष्प पुरवठा त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे, यांच्या प्रभावामुळे पुढील चार दिवस मध्य आणि वायव्य भारतात (India) पावसाची शक्यता आहे. यामुळे राज्यातही पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले असून पुढील दोन दिवस विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही भागात गारा पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावली तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. दरम्यान, सोमवारी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT