LPG Cylinder Price Hike esakal
नाशिक

LPG Rates Hike : ग्रामीण भागात गॅसधारक पुन्हा चुलीकडे!

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : प्रत्येक कुटुंबाचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आर्थिक बजेट. पगारावर चालणाऱ्या कुटुंबाला पगाराच्या मानाने सर्व तडजोड करावी लागते. यातच जर बजेट वाढले तर कुटुंबाची आर्थिक घडी थोडीफार प्रमाणात बिघडते. मागील काही वर्षांत उज्ज्वला योजनेतून १०० रुपयांत गॅस सिलिंडर देऊन चुलीमधून निघणाऱ्या धुरापासून महिलांची सुटका केली; पण आता गॅसचा दर तब्बल १०६० हजार रुपये झाल्याने त्याची झळ महिलावर्गाला बसू लागली आहे.

ग्रामीण भागात दिवसभर शेतावर किंवा रोजंदारीवर काम करून घरातील आर्थिक घडी बसवणे आता जिकिरीचे बनले आहे. घरगुती गॅसचे भाव वाढल्याने महिलावर्ग चुलीकडे वळल्याचे चित्र दिसते आहे. यामुळे ग्रामीण भागात आता पुन्हा चुली पेटू लागल्याने सरपण गोळा करण्यासाठी महिलांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे. (LPG cylinder rate hike ruined budget of house nashik news)

घरातील चुलीतील धूर बंद व्हावा, तसेच धुरामुळे फुफ्फुसाचे आजार होतात, डोळ्यांना त्रास होतो, जंगलतोड वाढते. यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत घराघरांत गॅस पोचला पाहिजे, या हेतूने चुलींचा वापर बंद झाला. मात्र, आता सिलिंडरचे दर वाढल्यामुळे अनेक घरांमध्ये गॅसचे रिकामे सिलिंडर पडून असल्याचे चित्र दिसून येते. कोरोनात अनेकांच्या हातचे काम गेले. त्यात अन्य संकटांमुळे शेती व्यवसायही अडचणीत आला आहे.

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कळित झाली आहे. एकीकडे आर्थिक अडचणी असताना दुसरीकडे महागाईचा भस्मासुर वाढत आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने १०० रुपयांत सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. सुरवातीला गॅस भरून घ्यायला परवडत होता. मात्र, गॅसची किंमत एवढी वाढली, की रोजंदारी करून गॅस भरणे जिकिरीचे झाले आहे.

गॅसधारक पुन्हा चुलीकडे

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण केले. त्यामुळे अनेकांनी गॅस घेतला. गत काही महिन्यांत गॅसचा भाव गगनाला भिडल्याने, तसेच सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला योजनेचे लाभार्थी व इतर गॅसधारक स्वयंपाकासाठी पुन्हा चुलीकडे वळले आहेत. गेल्या सात वर्षांत ४१० रुपयांवरून घरगुती गॅसचा दर १०६० रुपयांवर पोचला आहे.

त्यात ग्रामीण भागात तर घरपोच करण्यासाठी १०८० रुपये लागत आहेत. आता अनुदान मिळत नाही. शासनाने सिलिंडरवरील सबसिडी जवळपास बंदच केल्याने आता महागडे सिलिंडर परवड नाही. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे, असे शेतमजूर सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT