A bull market near the city. esaka
नाशिक

Lumpy Disease : कळवणमध्ये आदेश झुगारून बैल बाजार सुरू

सकाळ वृत्तसेवा

- लम्पी आजारामुळे जनावरे विक्री बंदचे प्रशासनाचे आदेश

- पशुवैद्यकीय प्रशासनाचा तहसील कार्यालयाकडे पत्रव्यवहार

कळवण (जि. नाशिक) : देशात सर्वत्र लम्पी आजारांचे थैमान सुरू असताना प्रशासनाने जनावरे बाजार विक्री बंद केली आहे. मात्र कळवण शहर याला अपवाद आहे. शहरालगत मध्यप्रदेश येथील बैल व्यापाऱ्याने प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बैल बाजार जनावरे विक्री करत आहे. (Lumpy Disease bull market starts defying order in Kalwan Nashik News)

कळवण तालुक्यात गोवंश ५३ हजार ९१४ नोंदणीकृत जनावरे आहेत. तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते संपूर्ण लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, तालुक्यात काही शेतकऱ्यांनी नवीन जनावरे विकत आणले आहेत. त्यापासून तालुक्यात लम्पी आजाराचा फैलाव प्रसार झाला आहे. तालुक्यातील बापखडा येथील शेतकरी सुनील यशवंत चौरे यांचा बैल, उत्तम उखा आहेर यांची गाय व मार्कडपिंप्री यांचा रामू गोविंदा ढुमसे यांचा बैल असे तीन जनावरे दगावले आहेत.

तर ९ जनावरे बाधित आहेत. बाधित जनावरांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यात इतर ठिकाणाहून लम्पी आजार येऊन जनावरे बाधित होऊ नये म्हणून जनावरे खरेदी विक्रीवर शासनाने बंदी घातली असल्याचे समजते. परंतु, कळवण तालुक्यात सर्रास आदेशाची पायमल्ली सुरु आहे. कळवण शहराच्या गणेशनगर भागात व नाकोडा रोड येथे मध्यप्रदेशातून बैल विक्रीसाठी आणले जात आहे.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

येथे दररोज बैलांचा बाजार भरतो याकडे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या बैल बाजारामुळे तालुक्यात लम्पीचा प्रसार होऊन मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे हा बैल बाजार बंद करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

"गोवंश जनावरांना लसीकरण करूनही लम्पी आजाराने तालुक्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे तालुक्यात बाहेरून येणाऱ्या जनावरे विक्रीवर बंदी करावी. तसेच, तालुक्यातील जनावरांची संख्या बघून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. मोठी आपत्ती आल्यास प्रशासनाची तारांबळ उडणार आहे. रिक्त जागा तत्काळ भराव्यात."

-अंबादास जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख

"बैल व गोवर्गीय जनावर विक्रीवर बंदी आहे. कळवणच्या आजूबाजूला सुरु असलेल्या बैल बाजाराबाबत तहसील कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असून संबंधितांवर लवकर कार्यवाही होईल.' -डॉ. एन. डी. पाईकराव, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT