Lumpy skin animal disease Sakal
नाशिक

Lumpy Skin Disease : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा विळखा! पशुसंवर्धन विभाग अलर्ट

सकाळ वृत्तसेवा

Lumpy Skin Disease : राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, पशुधनाला विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे.

राज्यात पाच हजार जनावरांना लम्पीची लागण झालेली असताना नाशिक जिल्ह्यात गत दोन महिन्यांत ४० जनावरांमध्ये लम्पीसदृश लक्षणे आढळून आली होती.

यात दोन जनवारे दगावली आहेत. ही बाब गांभीर्याने घेत पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना हाती घेतल्या. (Lumpy like symptoms were observed in 40 animals in district in last 2 months nashik news)

लम्पीबाधित जनावरे आढळून येत असल्याने लसीकरणाचा वेग वाढविण्यावर पशुसंवर्धन विभागाचा भर आहे. गेल्या वर्षी पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग यंदाही पुन्हा ‘अलर्ट’ मोडवर आहे.

जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाण, सिन्नर व नांदगाव तालुक्यांत जनावरांना बाधा झाली आहे. आदिवासी पट्ट्यात इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत अद्याप रोगाचा शिरकाव नाही.

गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थिती काहीशी बरी आहे. मात्र, रोगाचा धोका अजूनही पूर्णपणे टाळलेला नाही. लम्पीसदृश लक्षणे दिसून येत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या वर्षी गायी व दुभत्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. त्यानुसार गोवर्गीय जनावरांमध्ये बैलांनाही वेळेत लसीकरण करण्यात आलेले होते. त्यानुसार रोगग्रस्त जनावर आढळून आल्यास परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानुसार लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, गायींना लसीकरण झाले; परंतु तेथे जन्माला आलेल्या वासरांना लसीकरण करण्यात आले नव्हते. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या या लहान वासरांमध्ये आता हा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात पावणेनऊ लाख लशी उपलब्ध

जिल्ह्यात आठ लाख ९५ लाख ५० इतके गोवर्गीय पशुधन आहे. त्यानुसार संपूर्ण पशुधनासाठी आता लसीकरण उपलब्ध झाले. जुलैमध्ये चार लाख ४७ हजार ३६८ हे पहिल्या टप्प्यात लसीकरण पूर्ण झालेले आहे.

आता दुसऱ्या टप्प्यात चार लाख ४७ हजार ५०० लसमत्रा उपलब्ध असून, लसीकरण केले जाते. ३१ ऑगस्टअखेर लसीकरण करण्याचे ध्येय पशुसंवर्धन विभागाने निश्चित केले. त्यादृष्टीने नियोजनही झाले आहे.

प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना

- ग्रामपंचायतमार्फत पुन्हा ‘माझा गोठा- स्वच्छ गोठा’ मोहीम सुरू

- शिबिरे आयोजित करून जनजागृती कार्यक्रम

- प्राप्त लसमात्रानुसार वेगाने ऑगस्टअखेर लसीकरण पूर्ण करण्यावर भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT