Lumpy skin disease 
नाशिक

नाशिक : निफाड तालुक्यात नवा साथरोग आढळल्याने पशुपालक चिंतेत!

माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : तालुक्यातील चार गावांमध्ये ‘लंपी स्किन डिसिज’ हा जनावरांमध्ये आढळणारा विषाणू सापडल्याने पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे. अशक्तपणा आणि दुभत्या जनावरांवर याचा परिणाम होत असल्याची निरीक्षणे आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. (Lumpy skin disease has been found in cattle in Niphad taluka)


तालुक्यात या विषाणूचा आणखी संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने निफाड तालुक्यातील ओझर, विजयनगर, सायखेडा, कोठुरे या चार गावांमध्ये तसेच लगतच्या दहा किलोमीटर परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत ३२ जनावरे या आजाराने बाधित झाली असून, निफाड पंचायत समितीच्या पशुधन विकास विभागाने तातडीने लसीकरण केले आहे, तसेच आगाऊ लस बोलावून ठेवल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील अहिरे यांनी सांगितले.


‘लंपी स्किन डिसिज’ हा साथरोग असून, या रोगावर औषधोपचार आणि लस उपलब्ध आहे. प्रामुख्याने हा आजार लहान वासरांमध्ये अधिक असून, या आजाराचा प्रसार एका पशुधनापासून दुसऱ्या पशुधनाला चावणाऱ्या डासांमार्फत होऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. या आजारात जनावरांचे डोके, मान, पोट, पाठ आणि पायाला पाच सेंटिमीटर व्यासाच्या गाठी येऊ शकतात. हा आजार संकरित, देशी गायी तसेच म्हैस या जनावरांना होण्याची शक्यता आहे.


निफाड तालुक्यात सौम्य लक्षणे असलेली जनावरे आढळून आली आहेत. लसीकरण सुरू असून, साथ आटोक्यात आहे. तरीही पशुधन असणाऱ्यांनी गोठ्यात गोचीड, गोमाशी निर्मूलन फवारणी करावी व स्वच्छता राखावी. पंचायत समितीच्या पशुधन विभागाकडून या साथीवर नियंत्रण मिळविले जात आहे. काही लक्षणे असल्यास पशुवैद्यकीय विभागाकडे संपर्क साधावा.
-डॉ. सुनील अहिरे, तालुका पशुधन विकास अधिकारी


(Lumpy skin disease has been found in cattle in Niphad taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT