Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: टास्‍कमधून लाखोंच्‍या कमाईचे आमिष भोवले; तिघांना 12 लाखांना गंडविल्याचे उघड

टेलिग्रामद्वारे प्रीपेड टास्‍क पूर्ण करीत लाखोंची कमाई करण्याचे आमिष शहरातील तिघांना चांगलेच भोवले आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : टेलिग्रामद्वारे प्रीपेड टास्‍क पूर्ण करीत लाखोंची कमाई करण्याचे आमिष शहरातील तिघांना चांगलेच भोवले आहे.

भामट्यांनी या तिघांना सुमारे १२ लाख रुपयांना गंडविले असून, सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी ॲक्‍टनुसार गुन्‍हा दाखल केला आहे. (Lure of Lakhs of Earnings from Task three cheated of 12 lakhs Nashik Cyber ​​Crime)

या प्रकरणी शिवम दयानंद सूर्यवंशी (रा. कृष्णाईनगर) या युवकाने फिर्याद दाखल केली आहे. इंटरनेटवर अर्धवेळ (पार्टटाइम) कामाचा शोध घेत असताना गेल्‍या ऑगस्‍टमध्ये भामट्यांनी त्याच्याबरोबर टेलिग्रामवरून व मोबाईलच्‍या व्हॉट्‍सॲप क्रमांकावरून संपर्क साधला.

प्रीपेड टास्क पूर्ण करताना लाखो रुपयांची कमाई होईल, असे आमिष शिवमला दाखविले. यानंतर त्याने विविध बँक खात्‍यात रोख रक्‍कम भरली.

अशाच प्रकारे अंकिता रॉय आणि मिथुन दाते या दोघांचीही फसवणूक झाल्‍याचे समोर आले आहे. संशयितांनी दाखविलेल्‍या आमिषाला बळी ठरलेल्‍या या तिघांची एकूण ११ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

Kolhapur : अखेर इचलकरंजीला पंचगंगेचे शुद्ध पाणी मिळणार, ६०९ कोटी रूपये मंजूर; दोन वर्षात 'झेडएलडी’ प्रकल्प पूर्णत्वास येणार

११ वर्षांत २० टक्केच अनुदान! 'नैसर्गिक टप्पा वाढीच्या निर्णयाला बगल'; आजपासून शाळा बंद ठेवून शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT