Journalism Admission esakal
नाशिक

MA-MCJ Admission : पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी एचपीटीत प्रवेश प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जनसंज्ञापन आणि पत्रकारिता (एमए जेएमसी) पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र आहे.

पदवीप्राप्त आणि पदवी परीक्षेची अंतिम वर्षाची (सत्राची) परीक्षा दिलेले विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या https://forms.gle/H3RSpdLWRaw3wZ8j9 या लिंकवर नोंदणी करुन अर्ज भरावा, असे आव्हान प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी आणि विभागाच्या समन्वयक डॉ. वृन्दा भार्गवे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी ९७६५७३५४४५ आणि ८०८७९४६५०२ या मोबाइल क्रमांकांवर तसेच ०२५३२३११४५२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विषयाचा अभ्यासक्रम सन १९८३-८४ पासून एचपीटी महाविद्यालयात सुरू असून, हा अभ्यासक्रम सुरू करणारे हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे.

अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांबरोबरच मीडियातील पत्रकार या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उपलब्ध असतात. हा अभ्यासक्रम पूर्ण करुन या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी मीडियात करिअर करत आहेत. प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करुन आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT