Pandit Pradeep Mishra while guiding the devotees. In the second photograph, a devotee engrossed in bhajan esakal
नाशिक

Maha Shiv Puran Katha: मतांच्या राजकारणासाठी संस्कृतीचे विभाजन : पंडित प्रदीप मिश्रा

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : केवळ मतांच्या राजकारणासाठी भारताच्या एकात्मतेला आणि सनातनी संस्कृतीला विभागले जात आहे. परमेश्वराला जातीपातीत विभागणे चूक आहे, असे मत पंडित प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केले.

पाथर्डीजवळ आयोजित श्री शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. श्री. मिश्रा म्हणाले, की देशाला नष्ट करायचे असेल तर संस्कृती नष्ट केली जाते. ही अधर्मीय जमात मग देशाच्या संस्कारांना नष्ट करतात.

पर्यायाने राष्ट्र धोक्यात येते. मात्र शिवकथेसारख्या कथांमध्ये ग्रहण केलेले संस्कार घराघरांत जातात, त्यामुळे संस्कृतीचे संवर्धन होते. पर्यायाने देश अखंड आणि मजबूत राहू शकतो. (Maha Shiv Puran Katha Division of Culture for Opinion Politics Pandit Pradeep Mishra nashik)

मनुष्याचे शरीर मोठ्या प्रयासाने प्राप्त होते. त्यात देवाचे स्मरण केले नाही, तर जीवन व्यर्थ होते. नामस्मरण, भक्ती आणि सत्संगाने मनःशांती मिळते. महादेव भक्तीचे फल जाणणारा खरा ज्ञानी आहे. विश्वास प्रबळ नसेल तर फलप्राप्ती होत नाही.

चमत्कारांच्या मागे धावू नका. निखळ आणि निर्मळ भक्तीवर विश्वास ठेवा. देव तुम्हाला दान दिल्याशिवाय राहणार नाही. भक्तीपासून आज सर्व दूर होत आहेत. कोणालाही मेहनत नको, हे कटू सत्य आहे. शिवकथा कर्म पूर्ण करण्यास सांगते. दुःख मी दूर करेन, चमत्कार करेल असा दावा मी कधीही करत नाही.

मात्र देवाला शरण जा, तो तुमची हाक नक्की ऐकलं असा आग्रह धरतो. कोणतेही व्रत अथवा पूजन करा, त्याचे फल मात्र महादेवाच्या कृपेशिवाय मिळत नाही.

शिवतत्त्व सांगते मेहनत करा. दुःखापासून कुणीच वाचू शकत नाही. परंतु महादेवाच्या भक्तीने दुःख हमखास हलके होईल. दरम्यान, बुधवारी (ता. २१) वाढवलेला मंडपदेखील अपुरा पडला.

*कथा सुटल्यानंतर वडाळा पाथर्डी रस्ता मेट्रो झोनपासून एकेरी केला होता.

* तब्बल दीड तास पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा आणि इंदिरानगर भागात वाहनांची मोठी गर्दी

* गुरव समाजबांधवांकडून स्वयंस्फूर्तीने मैदान साफ

*प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातर्फे १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आणि त्याबाबत माहिती देणाऱ्या दालनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

*आरोग्य केंद्रात ७८० जणांवर प्रथमोपचार

*रक्तदान शिबिरात दोन दिवसात १७५ जणांचे रक्तदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT