Devotees sit in the hot sun to listen to the Maha Shiva Purana at Pathardi.  esakal
नाशिक

Maha Shiv Puran Katha: देवाच्या नामस्मरणासाठी वेळ काढ : पंडित प्रदीप मिश्रा

कथा ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी; एकादशीनिमित्त महाप्रसाद

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : शिवशक्ती आणि शिवभक्ती हा विश्वास असून आपण कोणत्याही क्षेत्रात कितीही ज्ञानी झालो, विद्या मिळवली तरी देखील अंतिमतः परमेश्वराची भक्तीरुपी शक्तीच आपणास कठीण प्रसंगी तारुण नेते. त्यामुळे देवाच्या नामस्मरणासाठी वेळ काढला पाहिजे असे मत पंडित प्रदीप मिश्रा यांनी श्री महाशिवपुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी व्यक्त केले.

सलग दोन दिवसांपासून वाढविण्यात आलेला मंडप गुरुवारी (ता.२३) देखील अपुरा पडला. त्यामुळे हजार श्रोत्यांना भर उन्हात कथेचा लाभ घ्यावा लागला. (Maha Shiv Puran Katha Pandit Pradeep Mishra statement Take Time to Remember Gods Name nashik)

रक्तदान करताना भाविक

पंडित मिश्रा म्हणाले, की अन्नदान, विद्यादान आणि भगवत ज्ञान यापेक्षा मोठे ज्ञान नाही. दररोज किमान पाच मिनिटे तरी देवाच्या आराधनेचा नियम घरात करून घ्या. पाप करण्याबाबतची भीती बाळगा.

प्रगतीच्या मार्गावर चालणाऱ्यालाच शिव्या शाप मिळतात. त्याचा विचार करू नका. संतांना देखील जिवंत असताना अपशब्द ऐकावे लागले.

पणे ते गेल्यानंतर त्यांची खरी महानता कळली. कर्म करत राहणे हाच एक ध्यास घ्या. घरातले मुल-मुली कर्ते झाले की ज्येष्ठांनी देवधारणा सुरू करावी.

वेळ काढून देवदर्शनाची आस धरा. त्यानिमित्ताने शरीरासाठी व्यायाम आणि मनासाठी शांती या बाबी साध्य होतील. बालपण ते वृद्धत्वाच्या वळणावर वाईट सवयी दूर करून देवभक्तीकडे वळा म्हणजे जीवन सफल होईल. देवावर श्रद्धा निर्मळ असेल तर तो तुम्हाला या सर्व बाबींपासून वाचवू शकेल.

गौतमी ऋषी आणि अहिल्यामाता यांना शेजाऱ्यांनीच त्रास दिला. मात्र त्यांच्या घोर तपश्चर्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि तुम्ही राहत असलेल्या गोदावरीचा जन्म झाला. त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग हे महान आहे. कारण या धरतीमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा आवास आहे.

‘सारी समस्या का हल एक लोटा जल’ असा संदेश त्यांनी आज दिला. नाशिकच्या चित्रा परदेशी, ऊर्मिला बडगुजर मंगला महाले आदींना देवभक्ती मुळे झालेल्या लाभाचे उल्लेख असलेल्या पत्रांचे त्यांनी वाचन करून दाखवले.

भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

गुरुवारी कार्तिकी एकादशी असल्याने भोजन कक्षात दुपारी १ हजार क्विंटल साबुदाणा खिचडी आणि सायंकाळी ५०० क्विंटल भगर चा महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.

तीन दिवसात ३ लाख भाविकांनी येथील भोजनाचा आस्वाद घेतल्याची माहिती लक्ष्मण सावजी आणि आर.डी. धोंगडे यांनी दिली. येथील आरोग्य केंद्रात १ हजार ४८८ जणांवर उपचार करण्यात आले.

तर ७८ जणांनी रक्तदान केले. मंचासमोर असलेल्या जागेत देखील आज कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Politics: मातब्बरांचा हिरमोड, नव्या समीकरणांचा उदय; बीडमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित महिलेसाठी राखीव, युतीच्या चर्चांना उधाण

Madhya Pradesh : मुख्यमंत्री मोहन यादव यांचा कठोर निर्णय, दोषींवर होणार कारवाई, तर कोल्ड्रिफ सिरपवर राज्यभर बंदी

Madha News : सहा तास चालला श्री माढेश्वरी देवीचा छबिना उत्सव; तुळजापूरच्या धर्तीवर असतो छबिना उत्सव

थिएटरमध्ये प्रत्येक दिवशी हाउसफुल तरी थिएटर मिळेनात; मग नाट्यगृहातच लावले 'कुर्ला टू वेंगुर्ला' चित्रपटाचे शो

Nashik Aadhaar Center : आधार कार्ड काढण्यासाठी हेलपाटे; देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे एकमेव केंद्र कायमस्वरूपी बंद

SCROLL FOR NEXT