Health Camp
Health Camp esakal
नाशिक

Nashik Health Camps : जिल्हयात आजपासून महाआरोग्य शिबिरे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हयामध्ये १५ ते ३१ डिसेंबर २०२२२ पर्यंत महाआरोग्य शिबिर होत आहे. जिल्हाभरातील १०६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५९२ आरोग्य उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, यांच्या समन्वयातून हे शिबिर राबवले जाणार आहे. (Mahaarogya camps in district from today Nashik Health Camps)

पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हयात महाआरोग्य शिबिरे घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय यांच्या समन्वयाने हे शिबिर होणार आहेत.

यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी तयारी करण्यात येत आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी आरोग्य उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. निदान व उपचार मोफत केले जाणार आहे. यासाठी सर्व स्तरावरून पोस्टर बॅनर यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

या तपासण्या होतील!

आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी हृदयरोग, रक्तदाब, डोळे तपासणी, मोतीबिंदू, टीबी ची तपासणी, दंतरोग, नाक कान घसा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, हाडांची तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये गुंतागुंत अथवा तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची गरज भासल्यास संदर्भ सेवेची सेवा दिली जाणार आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशांसाठी जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेतील मुख्यालयातून या शिबिराचे सनियंत्रण केले जाणार असून पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय परिवेक्षक त्या-त्या तालुक्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या शिबिराचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हयाचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी, श्रीमती मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, डॉ. सचिन खरात यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT