Organizing committee office bearers and members present to give information about the organization of Mahacritikon Parishad esakal
नाशिक

Mahacritikon 2023: महाक्रिटीकॉन 2023 परिषद उद्यापासून; राज्‍य स्तरावरून नऊशे डॉक्‍टर होणार सहभागी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन (आयएससीसीएम) यांच्या नाशिक शाखेतर्फे अकराव्या महाक्रिटीकॉन २०२३ या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे.

शुक्रवार (ता.२४) ते रविवार (ता. २६) दरम्‍यान हॉटेल एक्स्प्रेस इन येथे परिषद होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीतील उपचारांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक कार्यशाळा व व्याख्यान, समूह चर्चेतून मार्गदर्शन करतील. (Mahacritikon 2023 conference from tomorrow Nine hundred doctors from state level will participate nashik)

‘कोलॅबरेटिव्ह ट्रासफॉर्मेशन इन क्रिटिकल केअर मेडिसिन’ अशी परिषदेची संकल्पना असून, राज्‍यभरातून सुमारे नऊशे डॉक्‍टर सहभागी होतील, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.यतिंद्र दुबे, आयोजन समितीचे सचिव डॉ.पंकज राणे यांनी दिली.

याप्रसंगी आयएससीसीएम नाशिकचे अध्यक्ष डॉ. दिनेश वाघ, सचिव डॉ. रुचिरा खासणे, खजिनदार डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. भाविक शाह, डॉ. विलास कुशारे उपस्‍थित होते. डॉ. राणे म्‍हणाले, की यापूर्वी नाशिक शाखेतर्फे २०१५ मध्ये तिसऱ्या महाक्रिकटीकॉन राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते.

तेव्हा क्रिटिकल केअर इन रिसोर्सेस लिमिटेड सेटींग्स’ अशी परिषदेची संकल्पना होती. पुन्हा एकदा नाशिक शाखेला राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्याचा मान मिळाला आहे.

परिषदेच्या पहिल्या दिवशी विविध विषयांवर कार्यशाळा होतील. संपूर्ण परिषदेत एकूण नव्वदहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वक्‍ते मार्गदर्शन करतील.

डॉ.दुबे म्‍हणाले, की शनिवारी (ता.२५) सकाळी नऊपासून सत्रांना सुरवात होईल. याच दिवशी सायंकाळी सहा वाजता परिषदेचा औपचारिक उद्घाटन सोहळा होणार असून दिल्‍ली येथील ज्‍येष्ठ प्रत्‍यारोपण तज्‍ज्ञ डॉ. अमरिंदर सिंग सोइन यांची प्रमुख उपस्‍थिती असेल.

रविवारी (ता.२६) विविध सत्रांवरील परिसंवाद पार पडतील. डॉ. महाजन म्‍हणाले, की आपत्कालीन स्‍थितीतील उपचार ही सध्याच्‍या काळातील महत्त्वाची शाखा आहे. परिषदेतून अनुभव व अद्ययावत माहितीचे आदान-प्रदान होणार आहे.

या विषयांवर घडणार चर्चा

परिषदेमध्ये आपत्कालीन वैद्यकीय उपचार याविषयाच्या विविध पैलूंना स्पर्श केला जाणार आहे.

यामध्ये अपघातातील अत्यवस्थ रुग्णांना द्यावयाचे तातडीचे वैद्यकीय उपचार, प्रसूतीदरम्यान उद्भवणारी गुंतागुंत, हृदयविकार, मेंदूविकाराशी निगडित आपत्कालीन परिस्थितीतील उपचाराची दिशा, रक्तविकार संस्थेची तसेच पॅथेलॉजीची उपचार प्रक्रियेतील भूमिका अशा विविध विषयांवर तज्‍ज्ञ मार्गदर्शन करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT