Statue of Bharat Raja erected at Chhatrapati Sambhaji Chowk on Untwadi Road. Mahakavi Kalidasa has described this in his poem.  esakal
नाशिक

Mahakavi Kalidas Din 2023 : नाशिकच्या वैभवात हरपले ‘कालिदासां’चे शिल्प; शहरीकरणासोबतच हरवली शिल्प

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive : संस्कृत साहित्यात सात काव्यांचे ‘इंद्रधनुष्य’ निर्माण करणारे महाकवी कालिदास यांनी वर्णिलेल्या काव्याचे शिल्परुपी दर्शन नाशिककरांना घडावे म्हणून शहरातील सहा चौकांमध्ये उभारण्यात आलेले शिल्प वाढत्या शहरीकरणासोबत हरवून गेली आहेत.

सद्य:स्थितीला उंटवाडी रोडवरील छत्रपती संभाजी चौकात उभे असलेले एकमेव शिल्प नाशिककरांना महाकवी कालिदासांची आठवण करून देत आहे. (mahakavi kalidas poetry Sculpture lost with urbanization nashik news)

आषाढाचा पहिला दिवस म्हणजे सोमवारी (ता. १९) कालिदास गौरव दिन साजरा केला जात आहे. भारतीय साहित्यातील ‘सेक्सस्पिअर’ म्हणून महाकवी कालिदासांची गणना केली जाते. त्यांचा जन्मदिवस कुणालाही माहीत नसल्याने त्यांनी निर्माण केलेल्या ‘मेघदूत’ या काव्यातील दुसऱ्या श्लोकाची सुरवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ असा उल्लेख केल्यामुळे या दिवशी त्यांच्या गौरव दिन म्हणून साजरा होतो.

संस्कृत साहित्यातील या महान कवींची आठवण नाशिककरांना राहावी म्हणून त्यांच्या नावाने महाकवी कालिदास कलामंदिर उभारण्यात आले. या नाट्यमंदिरासमोर त्यांच्या ‘अभिद्न्यानशाकुंतलम’ या काव्यावर आधारित शिल्प उभारण्यात आले होते. मानवी भावनांचे निरूपण करून महाकवी कालिदासांनी निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे. त्यावर आधारित हरणांचे शिल्प या ठिकाणी उभारले होते.

विकासकामांत हे शिल्प काढून टाकण्यात आले. तसेच गंगापूर रोड, त्र्यंबकेश्वर रोड, उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉलजवळील अशीच शिल्प काढण्यात आली. सुशोभीकरण हा त्यामागील भाव असला तरी ‘महाकवीं’विषयी नाशिककरांना माहितीचा अभाव असल्याने त्याविषयी कुठेही वाच्यता झाली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सद्य:स्थितीला उंटवाडी रोडवरील छत्रपती संभाजी चौकात उभे असलेले एकमेव शिल्प हे शकुंतला व राजा दुष्यंत यांचा मुलगा राजा भरत हा महान असताना त्याने सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजले होते. त्याचे वर्णन महाकवींनी आपल्या काव्यात केले आहे. त्यांच्या काव्याची नाशिकमधील ही एकमेव आठवण आज शिल्लक राहिली आहे, असेच म्हणावे लागेल.

महाकवींची महानता

महाकवी कालिदासांनी निर्माण केलेल्या साहित्याशिवाय संस्कृत भाषा पूर्ण होत नाही. परंतु, त्यांनी निर्माण केलेल्या सात काव्यांमध्ये स्वत:बद्दल यत्किंचितही माहिती त्यांनी दिलेली नाही.

"महाकवींनी सात काव्यांचे लेने संस्कृत साहित्याला दिले. त्यांच्याशिवाय संस्कृत भाषा पूर्ण होऊ शकत नाही. या महाकवीची नाशिककरांना आठवण राहावी यासाठी नाशिकच्या चौकांमध्ये शिल्प उभारण्यात आले होते. निसर्गातील भाव, भावना मानवामध्ये प्रतित कशा होतील, हे बघणारे कवी म्हणजे महाकवी कालिदास होय. मानवी मनाचा सुक्ष्मरितीने ठाव घेणारे हे कवी होते." -डॉ. तन्मय भोळे, संस्कृत साहित्याचे अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT