Mahaonline System esakal
नाशिक

Mahaonline System: ऑनलाइन दाखले वितरण आता नियमानुसार; प्रथम येणाऱ्यास पहिले प्राधान्य, जंपीगला ब्रेक!

सकाळ वृत्तसेवा

Mahaonline System : दाखले वितरण ऑनलाइन झाले असले तरी, त्यात उशिरा अर्ज करणाऱ्यांना आधीच्यांना टाळून दाखले मिळत होते. मात्र आता शासनाने आता अधिक पारदर्शकता आणण्याचे नियोजन केले आहे.

यापुढे प्रथम अर्ज करेल, त्याला प्रथम दाखला मिळणार आहे. उशिरा अर्ज करून आधी दाखला मिळणार नाही. (Mahaonline System Online delivery of certificates with rule First come first served break to Jumpig nashik news)

महाऑनलाइन प्रणालीत हा बदल करण्यात आल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दाखले वितरणात अधिक पारदर्शकता येणार आहे. शैक्षणिक वर्षाची सुरवात झाल्यानंतर दाखले घेण्यासाठी प्रचंड गर्दी होते.

साधारण दहावी बारावीच्या परिक्षेनंतर जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमीलेअर, रहिवास, अधिवास दाखल्यासह नानाविध दाखल्यांसाठी गर्दी होते. सेतू आणि महाऑनलाइन केंद्रातर्फे अर्ज करीत विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची झुंबड उडालेली असते. त्यात नॉन क्रिमीलेअरसारखे अनेक दाखले काढण्याची परस्परांवर अवलंबून असल्याने त्यात किमान एक महिना खर्ची पडतो.

जातीचा व उत्पन्नाचा दाखला काढायचा हे दोन्ही दाखले मिळाल्यानंतर दोन्ही एकत्र जोडून त्यानंतर नॉन क्रिमीलेअरच्या दाखल्यासाठी अर्ज करावा लागतो. जर पहिलाच दाखला वेळेत मिळाला नाही तर त्यानंतरचे पुढील दाखले उशिरा मिळतात.

या दिरंगाईत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत संपली म्हणजे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात अडचणी येतात. दरवेळी ठराविक विद्यार्थ्यांना अशा मनस्तापाला सामोरे जावे लागतेच. हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दाखले मिळण्याची पद्धत ऑनलाइन झाल्यापासून महसूल कार्यालयासमोरील रांगा कमी झाल्या तरी ऑनलाइन अर्जाचा खच मात्र कमी झालेला नाही. उलटपक्षी पूर्वी विद्यार्थी आणि पालकांच्या गर्दीमुळे दाखल्यासाठी होणारी दिरंगाई निदान लक्षात तरी यायची पण आता ऑनलाइन दाखले किती पेंडिंग आहे, त्याची तीव्रता किती मोठी आहे.

हे लक्षातही येत नाही. डेस्क एक, डेस्क दोन यासह विविध डेस्कला अर्जाची संख्या प्रचंड असते. त्यात कार्यालयांमध्ये ओळख असलेल्यांकडून पाठपुरावा करून दाखले काढले जायचे. अनेकदा ओळखीच्या जोरावर उशिरा अर्ज करून काही जण दाखले मिळवायचे, पण आता हे सगळे प्रकार टळणार आहे. कारण ज्याने अगोदर अर्ज केला त्याला अगोदर मिळणार आहे.

एक तारखेला अर्ज केलेल्यांना टाळून त्यानंतर दोन किंवा तीन तारखांना अर्ज केलेल्यांना दाखले मिळणार नाही. संगणकीय प्रणालीत हा बदल केल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या न्यायाने दाखल्याचे वितरण होऊन अधिक पारदर्शकता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT