Police esakal
नाशिक

Police Transfers by Promotion : राज्यातील 449 सहायक निरीक्षकांच्या पदोन्नतीने बदल्या!

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पदोन्नतीने बदल्या केल्याने अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ वृत्तसेवा

Police Transfers by Promotion : महाराष्ट्र पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक पदावरील ४४९ अधिकाऱ्यांच्या पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीने बदल्या करण्यात आलेल्या आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पदोन्नतीने बदल्या केल्याने अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Maharashtra Police 449 assistant inspectors transferred by promotion )

महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक पोलीस निरीक्षक गेल्या काही वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील ४४९ सहायक निरीक्षकांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती करतानाच बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

त्यानुसार, नाशिक शहर आयुक्तालयात एक, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर एक असे दोघांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत तर, नाशिक शहर व ग्रामीणमधून ९ अधिकार्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये तिघे रूजू होणार आहेत. पदोन्नती झालेल्या पोलीस निरीक्षकांचे महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अभिनंदन केले आहे. (latest marathi news)

- नाशिकला आले

कीर्ती पाटील (बीडीडीएस, नाशिक), योगेश राजगुरु (जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक),

- नाशिकमधून बाहेर

राजू पठाण (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुजित ठाकरे (ना.ग्रा.मधून पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला), सचिन जाधव (मुंबई), नीता कायटे (ना.ग्रा.मधून मुंबई शहर), उमा गवळी (मुंबई शहर), नितीन खैरनार (मुंबई शहर), रामचंद्र कर्पे (ना.ग्रा.मधून लोहमार्ग,मुंबई), दत्तात्रय लांडगे (ना.ग्रा.मधून मुंबई शहर), सारिका थोरात (मुंबई शहर),

- पोलीस अकादमीत

जगदीश पवार (जालना), चारू भारती (नवी मुंबई), मनिषा जाधव (राज्य गुप्तवार्ता, ठाणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway Traffic Jam : कोकणात जाणाऱ्यांची लगबग; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लाब रांगा...

आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकणार! पोस्ट ऑफिस Mutual Funds चे नवे हब बनणार; ग्रामीण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

जन्माष्टमीला बाळाला कृष्ण केलं, तीन दिवसांनी नदीत उडी; चौथ्या दिवशी पतीने बाळासह तिथंच घेतली जलसमाधी....

Ganesh Chaturthi 2025: भारतभर गाजणारा बाप्पांचा जल्लोष! जाणून घ्या विविध राज्यांतील खास गणेशोत्सवाच्या परंपरा

Latest Marathi News Updates : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडला

SCROLL FOR NEXT