Maharashtra shines at National Youth Festival nashik news esakal
नाशिक

National Youth Festival: राष्ट्रीय युवा महोत्सवावर महाराष्ट्राची मोहोर; क्रीडामंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

नाशिकमध्ये पहिल्यांदाच झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राच्या युवकांनी सर्वसाधारण गटाचे विजेतेपद पटकावत महोत्सवावर राज्याची मोहोर उमटवली.

सकाळ वृत्तसेवा

National Youth Festival : नाशिकमध्ये पहिल्यांदाच झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राच्या युवकांनी सर्वसाधारण गटाचे विजेतेपद पटकावत महोत्सवावर राज्याची मोहोर उमटवली. महाराष्ट्रापाठोपाठ अवघ्या एका गुणाने हरियानाला दुसऱ्या, तर केरळला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

महोत्सवातील विविध आठ कलाप्रकारांत विजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले. (Maharashtra shines at National Youth Festival nashik news)

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या संचालक विनिता सूद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विजेत्यांना धनादेश व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १२) करण्यात आले.

त्यानंतर पाच दिवसांत शहरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. ३२ राज्यांतील सात हजारांवर युवक-युवती या स्पर्धांमध्ये सहभागी झाले. त्यातील विजेत्यांना मंगळवारी (ता. १६) हनुमाननगर येथील युवाग्राम येथे पारितोषिक देऊन सन्मान्नित करण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना दीड लाखांचा धनादेश, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना एक लाख आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना ७५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

या वेळी पालकमंत्री भुसे म्हणाले, की आगामी कुंभमेळा २०२७ मध्ये होणार असला, तरी त्यापूर्वीच युवकांचा मिनी कुंभ येथे पार पडला. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले युवक नाशिकविषयी सकारात्मक भावना घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगात सर्वाधिक युवकांची संख्या भारतात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी तरुणांनी समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

क्रीडामंत्री बनसोडे म्हणाले, की नाशिक जिल्हा प्रशासनाने अत्यंत परिश्रम घेत अवघ्या २० दिवसांत या महोत्सवाची तयारी पूर्ण केली. त्याची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली. त्यांनीही या महोत्सवाच्या नियोजनाचे कौतुक केले. यानिमित्त राज्य शासनाने ‘महाएक्स्पो’चे आयोजन केले होते.

या महोत्सवाच्या माध्यमातून देशातील युवक-युवतींमध्ये विचार, संस्कृतीचे आदान-प्रदान होऊन देशाची अखंडता आणि राष्ट्रवादाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी युवा महोत्सवात झालेल्या विविध कला, क्रीडा व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी आभार मानले.

विविध कलाप्रकारांतील विजेते

सांघिक विजेतेपद : महाराष्ट्र, हरियाना, केरळ

लोकनृत्य (समूह) : महाराष्ट्र, केरळ, पंजाब

लोकनृत्य (वैयक्तिक) : सृष्टी भारद्वाज (उत्तराखंड), सनी कुमार (हरियाना), धनिष्ठा काटकर (महाराष्ट्र)

लोकगीत (समूह) : केरळ, पंजाब, राजस्थान

लोकगीत (वैयक्तिक) : पृथ्वीराज (महाराष्ट्र), उमा वर्मा (मध्य प्रदेश) आणि छायारानी मेलांग (आसाम)

घोषवाक्य सादरीकरण : परिशा मिधा (दिल्ली), कार्तिकेय शर्मा (राजस्थान), शिखा (मध्य प्रदेश)

कथालेखन : सृष्टी दीक्षित (उत्तर प्रदेश), माही जैन (हरियाना) आणि नव्या एन. (केरळ)

पोस्टर मेकिंग : साहिलकुमार (हरियाना), महक सैनी (चंडीगड) आणि सौराद्युती सरकार (त्रिपुरा)

छायाचित्रण : संकल्प नायक (गोवा), सिमरन वर्मा (दिल्ली) आणि फुन फुन लुखाम (अरुणाचल प्रदेश)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT