ssc result esakal
नाशिक

SSC Result 2021 : नाशिक विभागाचा निकाल 99.96 टक्‍के

अरुण मलाणी

नाशिक : इयत्ता दहावीचा बहुप्रतिक्षित निकाल शुक्रवारी (ता.१६) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. दहावीचा नाशिक विभागाचा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबारचा समावेश असलेल्‍या नाशिक विभागाचा निकाल ९९.९६ टक्‍के लागला आहे. मुले व मुलींच्‍या उत्तीर्णाचे प्रमाण प्रत्‍येकी ९९.९६ असेच आहे. विभागात नंदुरबारचा सर्वाधिक ९९.९९ टक्‍के तर धुळ्यातील ९९.९८ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (maharashtra-state-board-nashik-division-ssc-result-2021-educational-marathi-news)

शासनाने ठरवून दिलेल्‍या सूत्रानुसार लागला निकाल

कोरोना महामारीमुळे (Corona virus) यंदा इयत्ता दहावीची लेखी परीक्षा होऊ शकली नव्‍हती. त्यामुळे इयत्ता नववीतील कामगिरी व अंतर्गत मुल्‍यमापनासंदर्भात शासनाने ठरवून दिलेल्‍या सूत्रानुसार दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नाशिक विभागात दोन लाख १५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी दोन लाख ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ६२ विद्यार्थ्यांचे निकाल तांत्रिक त्रृटीमुळे प्रलंबित आहेत. त्यात काही विद्यार्थी अनुत्तीर्ण असू शकतात.

(maharashtra-state-board-nashik-division-ssc-result-2021-educational-marathi-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘ई-केवायसी’ न केलेल्या शिक्षकांचा पगार थांबणार! शिक्षण संचालकांनी २० सप्टेंबरपर्यंत दिली शेवटची मुदत; मुदतीनंतर ऑक्टोबरपासून पगार बंद, वाचा...

Madmaheshwar Yatra : मद्महेश्वर धाम यात्रा पुन्हा सुरू; भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन अलर्ट मोडवर, सुरक्षेची नियमावली जाहीर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचे रक्षाबंधन गिफ्ट! खात्यात थेट जमा झाले अतिरिक्त २५० रुपये

Khato Lot Recipe: प्रोटीनचा डोस अन् भन्नाट चव! डाळी-तांदळापासून बनवा गुजराती ‘खाटो लोट’

आजचे पंचांग २१ ऑगस्ट २०२६! जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

SCROLL FOR NEXT