Real Estate Rules
Real Estate Rules esakal
नाशिक

Real Estate business : एजंटला ‘महारेरा’ चे प्रशिक्षण, प्रमाणपत्र बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बांधकाम व्यवसाय तसेच जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवहारांचे कायदेशीर ज्ञान या व्यवहारांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या अर्थात एजंटकडे असावे. तसेच, बांधकाम व्यावसायिक ग्राहक व एजंटमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण ( महारेरा) च्यावतीने व्यवसाय करताना प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी त्यापूर्वी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असून, अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन, ऑफलाइन स्वरूपात अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
२०१७ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) च्या वतीने बांधकाम व्यवसायिकांना त्यांचे प्रकल्प महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Maharera Training certificate mandatory for agents Real Estate Business Along legal knowledge decisions made to increase confidence of customers professionals Nashik News)

त्यानुसार आत्तापर्यंत महाराष्ट्रात ३८ हजार ७७१ प्रकल्पांची नोंद महारेराकडे झाली आहे. त्याचबरोबर बांधकाम व रिअल इस्टेट व्यवसायात एजंटाचे काम करणाऱ्यांनादेखील रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आले आहे. महारेराने त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आणखी नव्याने सुधारणा करताना एजंटसाठी नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञ एजंट, बँकिंग संस्थेतील तज्ञ, घर खरेदीदार ग्राहक, प्रवर्तक व ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल गव्हर्नन्सच्या मदतीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. १ मे २०२३ पासून अभ्यासक्रम सुरू होणार आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने एजंटला अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येणार आहे.

नव्याने एजंटाचे रजिस्ट्रेशन करताना किंवा रजिस्ट्रेशन नूतनीकरण करताना प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. महारेराच्या या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा द्यावा, अशी अनेक वर्षांपासूनच्या होणाऱ्या मागणीकडे वाटचाल सुरू झाल्याचे मानले जात आहे. महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी यासंदर्भात प्राधिकरणाने मंजूर केलेले आदेश पारित केले असून, तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महारेराच्या महत्त्वाच्या सूचना
- विद्यमान रिअल इस्टेट एजंटने पूर्वी महारेरा रिअल इस्टेट एजंटाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून अपलोड करावे.
- रिअल इस्टेट प्रकल्पाचे प्रवर्तक हे ग्राहकांना महारेराचे सक्षमतेचे प्रमाणपत्र असलेल्या एजंटची नावे व पत्ते ग्राहकांना देतील.
- रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये घर खरेदी किंवा वाटप करण्याचे काम करणाऱ्यांनादेखील कायदेशीर प्रशिक्षण आवश्यक ठरणार आहे.

महाराष्ट्र दिनापासून अंमलबजावणी
१ मे २०२३ पासून रिअल इस्टेट एजंटकडे महारेराचे योग्यता प्रमाणपत्र असेल, त्यांनाच एजंट म्हणून व्यवसाय करता येणार आहे.

का आहे प्रशिक्षणाची आवश्यकता?
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घर घेणे ही बाब महत्त्वाची असते. घर खरेदी करताना किंवा वाटप करताना चुका झाल्यास बांधकाम व्यावसायिक व ग्राहक दोघांचेही नुकसान होते. अनेकदा व्यावसायिक व ग्राहक यांना जोडणारा एजंट हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे रिअल इस्टेटीचा व्यवसाय करताना या तीनही घटकांमध्ये विश्वासाचे वातावरण आवश्यक आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे एजंटला बांधकाम व्यवसाय संदर्भात कायदेशीर ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. हा घटक सक्षम झाल्यास रिअल इस्टेट व्यवसायात अधिक पारदर्शकता येऊन कायदेशीर ज्ञान असलेल्या इस्टेट एजंटला महत्त्व प्राप्त होणार आहे.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

"रिअल इस्टेट एजंटला बांधकाम व्यवसाय संदर्भातील ज्ञान आवश्यक आहे. आता महारेराच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आल्याने त्याचा निश्चितच गुणात्मक परिणाम रिअल इस्टेट व्यवसायावर दिसून येईल."
- अनंत राजेगावकर, उपाध्यक्ष, नॅशनल क्रेडाई.

"रिअल इस्टेट एजंट हा या व्यवसायातील जबाबदार घटक आहे. यापूर्वीदेखील एजंट या घटकांनी कायद्याच्या अनुषंगाने प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली आहे. आता प्रशिक्षणाच्या माध्यमातून देखील तयारी आहे."
- वसंत सोनवणे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट.

"रिअल इस्टेट एजंट या घटकाचे कौशल्य विकसित करण्यासाठी महारेराने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे."
- प्रशांत नहार, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट कन्सल्टंट, एज्युकेशन कमिटी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT