Science Innovation Calendar was created by Mahendra Pangarkar, a science scholar  esakal
नाशिक

Nashik News: शालेय मुलांसाठी ‘सायन्स इनोव्हेशन कॅलेंडर’; विज्ञान अभ्यासक महेंद्र पांगारकरांनी केली निर्मिती

नाशिक तालुक्यातल्या शिंदे गावातील विज्ञान अभ्यासक महेंद्र पांगारकर यांनी २०२४ ला मुलांना वैज्ञानिक विचारांची नवीन भेट दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक तालुक्यातल्या शिंदे गावातील विज्ञान अभ्यासक महेंद्र पांगारकर यांनी २०२४ ला मुलांना वैज्ञानिक विचारांची नवीन भेट दिली आहे. त्यांनी सायन्स ॲन्ड इनोव्हेशन कॅलेंडर तयार करून पेटंटशी निगडित आणि विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींशी निगडित तारीख आणि महिन्यानुसार कॅलेंडरमध्ये वैज्ञानिक कार्याची नोंद केली आहे.

विज्ञानाची गोडी वाढावी तसेच वैज्ञानिक दृष्टीने तारीख साल वर्ष हे मुलांच्या लक्षात राहावे म्हणून सायन्स ॲन्ड इनोव्हेशन कॅलेंडरची निर्मिती केली आहे. (Mahendra Pangarkar created science scholar Science Innovation Calendar nashik news)

तुम्ही मराठी ‘शंकर आबाजी भिसे’ यांचे नाव ऐकले आहे का, या मराठी माणसाच्या नावे २०० संशोधने आहेत. तसेच तब्बल ४० पेटंट्स आहेत. यांना परदेशांत ‘एडिसन ऑफ इंडिया’ म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जे के रोलिंग या लेखिकेचे जगप्रसिद्ध पुस्तक हॅरी पॉटर प्रसिद्ध होण्याआधी एक दोन नव्हे तर तब्बल १२ प्रकाशकांनी, पुस्तकात दम नाही म्हणून नाकारलं होते, मात्र हॅरी पॉटरचे पुस्तक जगप्रसिद्ध पुस्तक झाले.

अशा अनेक किश्यांबरोबराच बुटाच्या लेसपासून ते ‘हेअरक्लिप’ पर्यंत, पिनपासून तर पेन्सिलपर्यंत याचे शोध कोणी व कधी लावले याची इत्यांभूत माहिती शालेय विद्यार्थ्यांना मिळेल या उद्देशाने कॅलेंडरची निर्मिती केली आहे.

सध्या विज्ञान अभ्यासकांसह केजी ते पीजीच्या मुलांना हे कॅलेंडर अभ्यास कॅलेंडर म्हणून वाटते आहे. शिंदे गावातील तरुण विज्ञान अभ्यासक व संशोधक महेंद्र पांगारकर हे मुलांमध्ये विज्ञान प्रसार व्हावा म्हणून सदैव प्रयत्न करत असतात. त्यांनी याआधी बनविलेल्या अनोख्या शास्रज्ञाच्या फोटोफ्रेम मुलांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत.

"मुलांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे, आवड निर्माण व्हावी. लहानपणापासून त्यांना पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क या शब्दांची ओळख व्हावी व त्याचे महत्त्व समजावे तसेच अनेक दुर्लक्षित, पण कल्पक लोकांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून ते हे चित्रमय कॅलेंडर घेऊन आले आहेत." - महेंद्र पांगारकर, विज्ञान अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT