main roads in soygaon Parijat Colony are in bad condition. esakal
नाशिक

सोयगावी मुख्य रस्त्यांचीच दुरवस्था; अच्छे दिन येणार कधी?

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : येथील सोयगाव भागातील अनेक नवीन वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था (Damaged Road) झाली आहे. येथील सोयगाव-टेहेरे चौफुली ते चर्च गेट रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. अनेक भागातील कॉलनीतील रस्ते चिखलमय (Muddy) झाले आहेत.

या रस्त्यांना अच्छे दिन कधी येणार आहेत, असा प्रश्‍न नागरीक उपस्थित करीत आहेत. चिखलामुळे वाहनचालकांना व पायी चालणाऱ्या नागरीकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. (main roads in soygaon Parijat Colony are in bad condition nashik latest marathi news)

बांधकाम विभागातर्फे सोयगाव- टेहेरे चौफुली ते चर्च गेट रस्त्याचे काम ३० जूनपर्यंत होणार असल्याचे सांगितले होते. मुदतीच्या १५ दिवसानंतरही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या भागातील अनेक कॉलनीतील रस्त्यांना कधी सुगीचे दिवस येणार, शहरात आठवडाभरापासून जोरदार पाऊस पडत आहे.

त्यामुळे वसाहतींमधील कच्च्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. जणू या ठिकाणी रस्ताच नाही अशी परिस्थिती नवीन वसाहतीत झाली आहे. अनेक नागरीक व शाळकरी मुलांना रस्ते खराब असल्यामुळे शाळेत पाठवत नाहीत. पारिजात कॉलनी, रवींद्र मेडिकल ते सूर्यवंशी लॉन्सपर्यंतच्या रस्त्यांची तीव्र दुर्दशा झाली आहे.

या भागातील सर्वात जुनी पारिजात कॉलनी व रवींद्र मेडिकल- सूर्यवंशी लॉन्सलगत कॉलन्या आहेत. या भागात आतापर्यंत पक्का रस्ताच नाही. या परिसरात छोट्या मोठ्या अपघातांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांवर दुचाकी व पायी चालणाऱ्या नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागला.

त्यामुळे अनेक नागरिकांना रस्त्यांमुळे दवाखान्यांचा खर्चात भर पडली आहे. परिसरातील रस्ते तातडीने दुरुस्ती करावेत, अन्यथा या भागातील महिलांकडून महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात तीव्र मोर्चा काढण्यात येणार असल्याचे परिसरातील महिलांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT