maize.jpeg 
नाशिक

विक्रमी उत्पादनानंतरही उन्हाळ्यात भासणार मक्‍याची चणचण!...कारण...

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) उत्तर महाराष्ट्र मका उत्पादनाचे आगार आहे. या वर्षी विभागात खरिपाची चार लाख 74 हजार 523 हेक्‍टर, तर रब्बीमध्ये 68 हजार 360 हेक्‍टरवर विक्रमी मका लागवड करण्यात आली. राज्यात आठ लाख 60 हजार हेक्‍टरवर खरीप, 
तर दोन लाख दहा हजार हेक्‍टरवर रब्बीचे उत्पन्न घेण्यात आले. प्रचंड उत्पन्न येत असतानाच बेमोसमी व अतिवृष्टीमुळे मक्‍याची प्रतवारी घसरली. परिणामी पोल्ट्री फीड उद्योग व स्टार्च उद्योगासाठी एप्रिलनंतर काही प्रमाणात बिहार व अन्य राज्यांतील मक्‍याची गरज भासणार आहे. 

बेमोसमी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान

राज्यातील पोल्ट्री फीड उद्योगाला 15 ते 18 लाख टन, तर स्टार्च उद्योगाला सहा ते आठ लाख टन मका लागत असल्याचा अनुमान आहे. नाशिक जिल्ह्यातील मका हे प्रमुख पीक आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात विक्रमी लागवड झाली. पीक काढणीच्या अवस्थेत असतानाच बेमोसमी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतातच मका सडला. काही ठिकाणी मक्‍याला कोंब फुटले. चाराही वाया गेला. जवळपास 30 टक्के पीक वाया गेले. 
शिल्लक असलेल्या मक्‍यापैकी काही प्रमाणात मालावर काळे डाग पडले. त्यामुळे बाधित मका पोल्ट्री फिड उद्योगासाठी वापरात घेत नाहीत. परिणामी मक्‍याचे भाव प्रथमच सतराशे रुपयापेक्षा अधिक गेले. खरिपातील 30 टक्के पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांनी रब्बीवर लक्ष केंद्रित केले. 

पोल्ट्री फीड व स्टार्च उद्योगाला 22 ते 25 लाख टन मक्‍याची गरज

नाशिक विभागात 68 हजार 360 हेक्‍टरवर रब्बीचा मका घेतला जात आहे. यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 33 हजार 749, तर नगरमध्ये 16 हजार 88 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. नाशिक सात हजार 550, धुळे आठ हजार 427, तर नंदुरबार जिल्ह्यात दोन हजार 546 हेक्‍टरवर पेरणी करण्यात आली आहे. सध्या तरी हे पीक चांगल्या स्थितीत आहे. राज्यातील पोल्ट्री फीड व स्टार्च उद्योगाला 22 ते 25 लाख टन मक्‍याची गरज भासते. अतिपावसामुळे पीक वाया गेल्याने तसेच पिकावर काळे डाग पडल्याने उर्वरित चांगला मका पोल्ट्री फीड उद्योगासाठी एप्रिलच्या मक्‍यापर्यंत पुरू शकेल. त्यातही रब्बीची अपेक्षित लागवड झाली नाही. परिणामी किमान दोन महिने परराज्यातील मक्‍याची गरज भासणार आहे. एप्रिल-मे या दोन महिन्यांत बिहारमधून मोठ्या प्रमाणावर मका महाराष्ट्रात विक्रीसाठी येतो. या वर्षी हा मका चांगलाच भाव खाईल. 

झालेल्या पेरण्या
- उत्तर महाराष्ट्रातील खरिपातील मक्‍याची पेरणी- चार लाख 74 हजार 523 हेक्‍टर 
- उत्तर महाराष्ट्रातील रब्बीची मक्‍याची पेरणी- 68 हजार 360 हेक्‍टर 
- राज्यातील खरीप मका पेरणी- आठ लाख 60 हजार हेक्‍टर 
- राज्यातील रब्बी पेरणी- दोन लाख दहा हजार हेक्‍टर 
- पोल्ट्री फीड उद्योगाला लागणारा मका- 15 ते 18 लाख टन 
- स्टार्च उद्योगासाठी लागणारा मका- सहा ते आठ लाख टन 

एकूण पुरवठ्यात वाढ होऊ शकेल

राज्यात खरिपात मक्‍याची विक्रमी तसेच रब्बीतही चांगली लागवड झाली. 2018-19 मध्ये दुष्काळ व लष्करी अळीमुळे राज्यात मक्‍याचा तुटवडा होता. तुलनेने 2019-20 मध्ये देशव्यापी उत्पादनात सुधारणा होत आहे. विशेषत: रब्बी पिकाखालील क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगली वाढ आहे. राज्यासह देशभरात मक्‍याचा तुटवडा भासणार नसून एकूण पुरवठ्यात वाढ होऊ शकेल. - दीपक चव्हाण शेतीमालाचे अभ्यासक, पुणे 

परराज्यातील मका काही दिवस घेणे परवडतो

नाशिक जिल्ह्यासह कसमादे पट्ट्यात खरीप मकाच प्रामुख्याने घेतला जातो. एप्रिल पर्यंत या भागातील मका पुरतो. यानंतर काही प्रमाणात पटणा, गुलाबबाग आदी बिहार मधील पट्ट्यातून मका आमच्याकडे येतो. येथील मक्‍याप्रमाणेच भाव असल्याने परराज्यातील मका काही दिवस घेणे परवडतो. - संजय हिरे संचालक, सुमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज, बेळगाव  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT