cotton sakal
नाशिक

विक्रमी दर मिळुनही पांढरे सोने झाले नकोसे | Nashik

प्रविण खैरनार

सायगाव (जि. नाशिक) : येवले तालुक्यातील उत्तर- पूर्व भागातील सायगाव परिसरात कपाशीवर चार वर्षांपासून सतत बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असल्याने दर वर्षी क्षेत्र कमी होत आहे. या वर्षी तर विक्रमी दर मिळत असूनही जास्त पाऊस आणि बोंडअळीने मोठे नुकसान केल्याने हातात फारसे काही पडणार नसल्याने शेतकऱ्यांना आता हे पीक नको म्हणण्याची वेळ आली आहे.

बीजी-३ या तंत्रज्ञानाच्या बियाण्याला परवानगी देणे गरजेचे

एकेकाळी या दुष्काळी भागात कपाशीला अनेक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याने क्षेत्रही वाढले, आर्थिक आधारही मिळाला; पण बोंडअळीचे संकट आल्यापासून उत्पादन कमी होत आहे. इतर सोयाबीन, मका पिकाच्या तुलनेत उत्पादनखर्चही जास्त येत आहे. या वर्षीही अतिपाऊस आणि बोंडअळीने या पिकांची वाट लागली. अनेकदा सहा वेळा वेचणी होते. यंदा तर दोन वेचणीतच शेत रिकामे करावे लागले. उत्पादनखर्च एकरी पंचवीस हजारांच्या पुढे गेला असताना विक्रमी सरासरी आठ हजार रुपयांचा दर मिळूनही उत्पादनखर्च आणि मिळालेले उत्पादन पाहता विक्रमी दर मिळूनही हातात फाससे काही पडणार नसल्याने हे पीक आता नकोसे झाले आहे. बीजी-२ या तंत्रज्ञानातून औषध फवारणी करूनही बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने पुढे केंद्र शासनाने बीजी-३ या तंत्रज्ञानाच्या बियाण्याला परवानगी देणे गरजेचे आहे अन्यथा हे पीक या भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

''पांढऱ्या सोन्याला विक्रमी दर मिळत आहे; पण बोंडअळीने उत्पादन इतके कमी झाले झाले आहे, की उत्पादनखर्चही निघणे ही मुश्कील झाले आहे. दरवर्षीच तोटा होत असल्याने हे पीक आता नको झाले आहे. शासनाने बीजी- ३ या तंत्रज्ञानाला परवानगी द्यावी.'' - दिलीप जेजुरकर, शेतकरी सायगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Test Squad Announced: रिषभ पंतचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

Unseasonal Rains Cause: "पीक गेलं, आशा संपल्या… आणि आता जिओ टॅगिंगचा फोटोंचा त्रास शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाला कधी ऐकू येणार?"

Pune Viral Video: बिबट्याची थेट घरात एंट्री! मुलगा झोक्यावर… अन् पुढं काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ व्हायरल!

Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

Mumbai News: पुलाचे काम रखडले! घाटकोपरमध्ये पाच वर्षांपासून दुर्लक्ष; रहिवाशांची गैरसोय

SCROLL FOR NEXT