drama sakal
नाशिक

Rajya Natya Spardha 2023: राज्य नाट्याच्या स्पर्धांसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिकेची मुदत

सकाळ वृत्तसेवा

Rajya Natya Spardha 2023 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ३ जानेवारी २०२४ पासून सुरू होणाऱ्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्याचे संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. (Major roads cleared by Italy mechanical brooms 160 km roads will be shiny Nashik News)

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. चवरे यांनी नमूद केले आहे.

२० व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ३ जानेवारीपासून विविध १० केंद्रांवर तर ६२ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर १५ जानेवारीपासून होणार आहे.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध होतील.

आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन सादर कराव्यात. आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाइन प्रवेशिका भरता येणार नाही.

नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT