Employees of the city transport department putting 'anti-manja tar' on two-wheelers esakal
नाशिक

Makar Sankranti Drive : वाहतूक शाखेतर्फे दुचाकींना ‘ॲन्टी मांजा तार!’

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : दुचाकीस्वारांचा नायलॉन मांजामुळे अपघात टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखा युनिट एक व पोलिसमित्र परिवाराकडून मकरसंक्रांतीनिमित्त सुमारे २०० दुचाकींना ‘ॲन्टी मांजा तार’ लावण्यात आल्या. वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. (Makar Sankranti Drive Anti Manja Tar for two wheelers by traffic police department nashik news)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सध्या राज्यभर रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांकडून दुचाकी व चारचाकी चालविणाऱ्या वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे.

याच उपक्रमांतर्गत शहर वाहतूक शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष पवार व पोलिसमित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीनिमित्त हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सकाळी स्वामिनारायण चौक , पंचवटी येथे सुमारे दोनशे दुचाकी वाहनांना नायलॉन मांजापासून दुखापत होऊ नये म्हणून अॅन्टी मांजा तारी लावण्यात आल्या.

या वेळी पोलिसमित्र परिवार समन्वयक समितीचे राज्य संघटक सुनील परदेशी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राहुल जोरे, नितीन गोरे, योगेश पाटील तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी दयाराम डांगे, शिवाजी बोडके, भगवान तुपलोंढे, किरण घुगे, राजेंद्र ढोले, रवींद्र करवंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT