Kite lovers enjoy flying kites on the roof of a building on the occasion of Makar Sankranti on Sunday.
Kite lovers enjoy flying kites on the roof of a building on the occasion of Makar Sankranti on Sunday. esakal
नाशिक

Kite Festival : रंगबेरंगी पतंगाने व्‍यापले आसमंत..! शहरात पतंगबाजीचा उत्‍साह शिगेला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संगीताच्‍या तालावर मनसोक्‍त थिरकताना तरुणाई.. वाऱ्याच्‍या दिशेचा वेध घेत पतंगाला ढील देताना पतंगबाज.. असा शहरी भागात पतंगबाजीचा उत्‍साह बघायला मिळाला. रविवारी (ता. १५) दिवसभर रंगबेरंगी पतंगांनी आसमंत व्‍यापले होते.

पतंग कापताना ‘गई बोल रे धिना’ चा नारा ऐकायला मिळाला. सायंकाळी सूर्यास्‍तापर्यंत पतंगबाजीचा उत्‍साह कायम टिकून होता. (Makar Sankranti Festival sky covered with colorful kites Kite flying started in city nashik news)

पतंगप्रेमींचे आकाशात अतिउंच गेलेले पतंग.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे सण- उत्‍सव साजरे करण्यावर निर्बंध आलेले होते. या वर्षी सर्वच उत्‍साह धुमधडाक्‍यात साजरे केले जाता आहेत. मकरसंक्रांतीनिमित्तही असाच उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. सकाळपासून बच्चे कंपनीसह युवा वर्गाने आपली पावले इमारतीच्‍या गच्चीकडे, मोकळ्या मैदानाकडे वळविली होती.

वाहत्‍या हवेचा अंदाज घेताना पतंगबाजीला सुरवात करण्यात आला. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक ठिकाणी संगीत व्‍यवस्‍था करण्यात आलेली होती. ध्वनिक्षेपकावरील हिंदी, मराठी गाण्यांवर थिरकताना तरुणाईने मौजमजा केली.

पतंग, मांजा खरेदीची लगबग सुरूच

सायंकाळी उशिरापर्यंत पतंग, मांजा खरेदीची लगबग सुरूच होती. दूध बाजार, जुने नाशिक भागातील दुकानांवर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ बघायला मिळाली. याशिवाय उपनगर भागांमध्ये पतंग, मांजा विक्रीची दुकाने चौकाचौकांमध्ये थाटलेली होती. येथून पतंग व मांजा, रीळ खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत होता.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

पतंग उडवण्याचा आनंद लुटताना मुलीसह वडील

पतंग जीवघेणी धाव

पतंगोत्‍सवात चित्तथरारक भाग असलेली पतंग कापण्याची स्‍पर्धा अनेक ठिकाणी बघायला मिळाली. त्‍यातच कापलेली पतंग झेलण्यासाठी चिमुकल्‍यांकडून जीवघेणी धाव सुरू अहेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'सल्‍याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळाले. तसेच, कापलेल्‍या पतंगापासून तुटलेला मांजा विद्युत पुरवठा करणारे खांब, वायरसह झाडांवर अडकल्याचेही बघायला मिळाले.

पतंगोत्‍सवाची क्षणचित्रे..

* सुमारे दहा तासांहून अधिक वेळ पतंगोत्‍सवाचा धम्‍माल

* रात्री आकाशात आढळल्‍या दिवा पतंग

* अनेकांनी सहकुटुंब, मित्र- परिवारासोबत लुटला पतंगबाजीचा आनंद.

* युवकांप्रमाणे युवतींमध्ये पतंग उडविण्याची राहिली उत्‍सुकता.

* चिमुकल्‍यांनीही रीळ हाती घरत पतंगबाजीचा केला सराव

* सोशल मीडियावर पतंगोत्‍सवाचे व्हिडिओ, छायाचित्रे व्‍हायरल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT