malegav powerloom.jpg 
नाशिक

"शुरवात तो हुई, उम्मीद तो जगी' मालेगावमध्ये अखेर यंत्रमागांचा खडखडाट सुरू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  शहरातील अर्थकारणाचा कणा असलेला यंत्रमागांचा खडखडाट हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर शनिवारी (ता. 30) येथील सुमारे 12 हजारांहून अधिक यंत्रमाग सुरू झाले. त्यामध्ये पाच हजार कामगार कामावर गेले. यंत्रमागमालक, कामगार, यार्न मर्चंट व प्रशासनाने "शुरवात तो हुई, उम्मीद तो जगी', अशी भावना व्यक्त केली. 

"शुरवात तो हुई, उम्मीद तो जगी'
सोमवारपर्यंत सुमारे पन्नास हजारांहून अधिक यंत्रमाग सुरू होतील, असा विश्‍वास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक व समन्वय अधिकारी सुनील कडासने यांनी व्यक्त केला. प्रामुख्याने शहरातील द्याने, आझादनगर, म्हाळदे शिवार, सवंदगाव, देवीचा मळा व शहराबाहेरील महामार्गाला लागून असलेले यंत्रमाग सुरू झाले. ज्या कारखान्यात तयार कापड गाठी कमी प्रमाणात शिल्लक आहेत, पेमेंट मिळाले व तयार सूत बिम पडलेले आहेत अशा काही मोजक्‍या मालकांनी कारखाने सुरू केल्याचे यंत्रमागमालकांच्या प्रतिनिधींनी सांगितले. प्रशासनाने सुचविलेल्या उपाययोजना करून, मार्केटचा अंदाज घेत, पाली बालोत्रा माल जावू लागताच उर्वरित यंत्रमाग सुरू होतील. प्रारंभी कामगारांना प्रसंगी दोन टप्प्यांत तीन-तीन दिवस आलटून पालटून काम देण्याचे नियोजन काही मालक करत आहेत. 

मालेगावमध्ये 12 हजार यंत्रमागांचा खडखडाट सुरू 
सायजिंग सुरू झाल्यास अडचणी दूर होतील. सूतपुरवठ्यात अडचण नाही. तथापी यंत्रमागमालक, यार्न मर्चंट व कामगार असा समन्वय असणे आवश्‍यक आहे. प्रशासनातर्फे पोलिस, महसूल व मनपा असे एकत्रित पथक कारखान्यांना भेटी देऊन पाहणी करीत आहेत. श्री. कडासने यांनी वेगवेगळ्या कारखान्यांत भेटी देत मालकांना थर्मल मीटर व ऑक्‍सिपल मीटर ठेवावे यांसह प्रशासनातर्फे विविध सूचना दिल्या. सर्व उपाययोजना करण्यास व कामगारांना सर्व सोपस्कार अंगवळणी पडण्यास काही कालावधी लागेल, असे काही मालक व कामगारांनी सांगितले. 

हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

यंत्रमागमालक व कामगारांना सचना 
* कारखान्यात तपासणीसाठी थर्मल व ऑक्‍सिपल मीटर आवश्‍यक 
* यंत्रमाग कामगारांनी एका ताटात एकत्रित जेवू नये 
* कारखाना व परिसरात जवळजवळ बसून गप्पा मारू नये 
* चहाची सोय कारखान्यात करावी 
* शौचालय, स्वच्छतागृह वेळोवेळी शेती पाठपंपाने स्वच्छ करावे 
* कारखान्यातील वस्तू सॅनिटाइज कराव्यात 
* मालक, कामगारांनी हात वेळोवेळी धुवावेत 
* सोशल डिस्टन्सिंग राखावे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला, हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

IAS Anurag Yadav: तुम्ही असं बोलू शकत नाही... मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांशी भिडला आयएएस अधिकारी, कोण आहेत अनुराग यादव?

'हा' आहे जगात सगळ्यात जास्त विकला जाणारा मोबाईल; जाणून Samsung अन् Vivo ला आश्चर्याचा धक्का, भारतात किंमत एवढीशी की...

Sathankulam Custodial Death Case : धमक्यांना घाबरली नाही, वरिष्ठांचे कांड कोर्टात बेधडक सांगितलं; कोण आहे महिला पोलिस रेवथी?

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण! मुंबई-पुण्यात सोनं-चांदी स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT