Malegaon and Deola talukas of district rain on 9 june nashik news esakal
नाशिक

Nashik Rain Damage : देवळा, मालेगावला पावसाची हजेरी; टोकडेत शाळेचे पत्रे उडाले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Damage : जिल्ह्यातील मालेगाव आणि देवळा तालुक्यातील काही भागात शुक्रवारी (ता.९) दुपारनंतर पावसाने हजेरी लावली.

यावेळी मालेगाव तालुक्यातील टोकडे, झोडगे व देवळा शहर व तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. ( Malegaon and Deola talukas of district rain on 9 june nashik news)

मृग क्षत्राचे आगमन होताच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी मालेगाव तालुक्यातील तालुक्यातील झोडगे व परिसरात शुक्रवारी (ता.९) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर रस्त्यात उभा असलेला ट्रक शेजारील दुसऱ्या ट्रकवर कलंडला.

सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. झोडगे शिवारात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नजीकच्या टोकडे (ता. मालेगाव) येथील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालयाचे छतावरील बहुसंख्य पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पत्रे उडाल्यानंतर शाळेच्या भिंतीची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शाळेच्या पश्‍चिमेकडील बाजूच्या खिडक्या उघड्या असल्याने शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यामुळे शाळेचे छत उडून गेल्याचे सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

देवळ्यात हलक्या सरी

देवळा शहर व तालुक्यात मॉन्सूनच्या पावसाने वादळी वाऱ्यांसह सायंकाळी हजेरी लावली. गुंजाळनगर ते वाखारी रस्तावर झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक सेवा ठप्प झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होता. सायंकाळी वादळ व पावसाचे आगमन झाल्याने हलक्याशा सरी कोसळल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला. विजेच्या कडकडाटामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT