crime esakal
नाशिक

Malegaon Crime: मालेगाव हादरलं! पित्याची सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या

रुपेश नामदास

मालेगाव: तालुक्यातील आघार-ढवळेश्‍वर रस्त्यालगत राहणाऱ्या यशवंत लक्ष्मण हिरे (वय ४२) व त्यांचा लहान मुलगा रुद्र यशवंत हिरे (वय ६) या पिता-पुत्रांनी अजंग शिवारातील शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आघार येथील यशवंत हिरे यांचा पशुखाद्यचा व्यवसाय आहे. विशेषत: म्हशींना लागणारे बिअर खाद्य ते घाऊक भावाने घेऊन ग्रामीण भागात त्यांच्या पिकअपमधून किरकोळ विक्रेत्यांना विकतात. आज सकाळी त्यांनी मुलगा रुद्र यालाही बरोबर घेतले. शहरालगतच्या मनमाड चौफुलीवरुन बिअर खाद्य घेत ते पिकअपमध्ये भरले.

अजंग-रावळगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या विहिरीजवळ त्यांची पिकअप उभी होती. विहिरीबाहेर चपलांचे दोन जोड होते. दीर्घकाळ पिकअप उभी असल्याने परिसरातील काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती अजंग येथील पोलिसपाटीलांना दिली. पोलिसपाटीलांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांना सांगितले.

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तातडीने मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे शकील तैराक यांनी प्रथम यशवंत यांचा व नंतर रुद्रचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

यशवंत यांनी मुलगा रुद्रला मिठी मारली होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे आघार व परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करीत आहेत.

वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा होत असून परिसरात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT