crime sakal
नाशिक

मालेगाव : चरस, दुचाकीसह पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त; तिघांना अटक

तिघा संशयितांना अटक करून सुमारे दीड लाखाचे चरस, एक दुचाकी असा सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरात कुत्ता गोली (अल्प्राझोलम), गांजा विक्री सुरू होती. पाठोपाठ चरस विक्री सुरू असल्याचेही पोलिसांना निदर्शनास आले. यानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी त्यांच्या विशेष पथकास मालेगाव परिसरात गस्ती घालण्याचे व चरस विक्री करणाऱ्या संशयितांची माहिती काढण्याचे आदेश दिले. उपमहानिरीक्षकांच्या पथकाने गस्तीवर असताना तिघा संशयितांना अटक करून सुमारे दीड लाखाचे चरस, एक दुचाकी असा सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त केला. बुधवारी (ता. २०) रात्री ही कारवाई करण्यात आली.

शहरातील जुन्या महामार्गावरील नॅशनल पेट्रोलपंपाजवळ काही व्यक्ती चरस (अमली पदार्थ) विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती गस्ती पथकास मिळाली. पथकाने स्कूटरवरील (एमएच ४१ एएफ ९३४६) तिघे संशयित पंपानजीक आले असताना छापा टाकून त्यांच्याजवळून सुमारे एक लाख ४४ हजार ३०० रुपयांचे ४८१ ग्रॅम चरस, ३० हजारांची स्कूटर, ५०० रुपयांचा मोबाईल असा सुमारे एक लाख ७४ हजार ८०० रुपयांचा ऐवज मिळून आला.

पोलिसांनी चरस व सर्व वस्तू जप्त करीत पंचनामा केला. या प्रकरणी मोहंमद सईद फारुख कुरेशी (५३, रा. अख्तराबाद), रफिक मोहंमद याकूब (३२, कुंभारवाडा), मोहंमद अमीन समीउल्ला अन्सारी (४०, रा. अख्तराबाद, तिघे रा. मालेगाव) यांना अटक केली. विशेष पथकाने तिघा संशयितांना रमजानपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. रमजानपुरा पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Snake in Grapes Farm : शेतकऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला! द्राक्ष वेलीवर वेटोळे घालून बसलेल्या नागाला पाहून काळजाचं पाणी झालं; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ..

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ४०० कोटींच्या कथित अपहरण प्रकरणात मोठी घडामोड

Satej Patil Hasan Mushrif Vinay Kore Alliance : सतेज पाटील, मुश्रीफ, विनय कोरे एकत्र येणार?, झेडपीतील पाडापाडीमुळे ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी

प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

SCROLL FOR NEXT