Police Transfer esakal
नाशिक

Nashik: मालेगावला लाभले 5 नवे कारभारी! आगामी निवडणुका, कायदा सुव्यवस्थेसाठी तिघा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

शहरात पाच नवीन पोलिस निरीक्षक दाखल होत आहेत. यातील दोघा, तिघांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण पोलिस यंत्रणेतील २७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही एकाच पोलिस ठाण्यात असलेल्या, गुन्ह्यांचे तपास प्रलंबित आणि निवृत्तीसाठी सहा महिने कालावधी असलेल्या तसेच जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या करण्यात आल्या आहेत.

शहरातील पाच पोलिस ठाण्यात नवीन कारभारी नियुक्त झाले आहेत. (Malegaon got 5 new stewards Upcoming election transfer of three police officers for law and order Nashik)

शहरात पाच नवीन पोलिस निरीक्षक दाखल होत आहेत. यातील दोघा, तिघांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. येथील छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांची दिंडोरी येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर राजेंद्र पाटील यांची बदली झाली आहे.

तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांची आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण येथे बदली झाली. त्यांच्याऐवजी तालुका पोलिस ठाण्यात राहुल खताळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

येथील शहर पोलिस ठाण्यात संजय सानप हे तर किल्ला पोलिस ठाण्यात शिवाजी डोईफोडे यांची पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आजवर किल्ला पोलिस ठाण्याचा पदभार सहाय्यक निरीक्षक गौतम तायडे यांच्याकडे होता. नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक सुनील भाबर यांची मालेगाव शहर वाहतूक शाखेत नियुक्ती झाली आहे.

येथे सहाय्यक निरीक्षक देवेंद्र शिंदे काम पाहत आहेत. कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची नाशिक नियंत्रण कक्षात नियुक्ती झाली आहे. श्री. शेगर, श्री.मगर, श्री. भोसले या येथील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

पाच पोलिस निरीक्षक नव्याने रुजू झाले. कसमादेतील सटाणा पोलिस ठाण्यात जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक बाजीराव पवार यांची नियुक्ती झाली आहे. तर कळवण पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांची नियुक्ती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT