Malegaon Bazaar Committee esakal
नाशिक

Malegaon Market Committee Election : 26 अर्ज अवैध; मातब्बर उमेदवार बाहेर

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि.नाशिक) : येथील बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या २०२ उमेदवारी अर्जांपैकी २६ जणांचे अर्ज अवैध ठरले. यात सोसायटी- सहकार संस्था गटात ८ तर ग्रामपंचायत गटात १८ अर्ज अवैध ठरले. अवैध ठरणाऱ्यांमध्ये बहुसंख्य मातब्बर उमेदवारांचे अर्ज आहे. (Malegaon market Committee election 26 application invalid nashik news)

निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या देखरेखीत सकाळी अकराला अर्ज छाननीस सुरवात झाली. इच्छुक उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधी गटातील उमेदवारांच्या अर्जांवर हरकत न घेतल्याने वादाचे प्रसंग टळले. अर्ज छाननीत २०२ पैकी २६ अर्ज तांत्रिक कारण व कागदपत्रांची अपूर्तता असल्याने अवैध ठरविण्यात आले.

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत २०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील दोनपेक्षा अधिक अर्ज दाखल करणाऱ्यांचा एकच अर्ज ग्राह्य धरण्यात आला. छाननीसाठी इच्छुक उमेदवार समर्थकांसह उपस्थित होते. ग्रामपंचायत गटात व अन्य गटातील उमेदवारांना रहिवासी दाखला मागण्यात येत होता. मुळात ग्रामपंचायतीत निवडून आलेले व गावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांना रहिवासी दाखला का? हा प्रश्‍न भेडसावत होता.

काही उमेदवारांनी तलाठी तर काहींनी ग्रामसेवकांचा रहिवासी दाखला आणला होता. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी उमेदवारांना दुपारी तीनपर्यंत वेळ देण्यात आली. व्यापारी गटातील १६ व हमाल मापारी गटातील ६ असे सर्व अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज माघारीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत आहे. २१ एप्रिलला चिन्ह वाटपासह निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

सोसायटी गटात अवैध ठरलेले उमेदवार

अनिल देवरे (मेहुणे), मनोहर साळुंके (सावकारवाडी), रत्नकांत निकम (पाटणे), आनंदसिंग ठोके (आघार), योगिता नंदाळे (निमगाव), उषा शेवाळे (सावतावाडी), यात रत्नकांत निकम व योगिता नंदाळे यांचे प्रत्येकी दोन अर्ज अवैध ठरले.

ग्रामपंचायत गटात अवैध ठरलेले उमेदवार

राजेंद्र निकम (गुगुळवाड), गोकूळ सूर्यवंशी (अजंग), अनिल पवार (पिंपळगाव), प्रदीप देवरे (अस्ताने), किरण पाटील (चिंचावड), रवींद्र जाधव (टिंघरी), अनिल बोरसे (वनपट), नंदकिशोर काशीद (लेंडाणे), रवींद्र पवार (लोणवाडे), आशाबाई शिंदे (शेंदुर्णी), गणेश महाले (शेरुळ), सूर्यप्रकाश देवरे (खडकी), सुनील सकट (निळगव्हाण), कल्पना भालेराव (नागझिरी), नाना म्हसदे (द्याने), राजश्री बोरसे (दसाने), गोकुळ सूर्यवंशी (अजंग), रवींद्र निकम (ढवळेश्‍वर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT