Dada Bhuse vs Advay Hirey
Dada Bhuse vs Advay Hirey esakal
नाशिक

Malegaon Market Committee Election : भुसे-हिरे समर्थकांमध्ये सरळ लढत; गुरुवारी उमेदवारांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

Malegaon Market Committee Election : येथील बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक २८ एप्रिलला होत आहे. समितीच्या १८ जागांसाठी २०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २० एप्रिलला आहे.

राजकीय परिस्थिती पाहता पालकमंत्री दादा भुसे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांमध्ये सरळ लढत होणार आहे. (Malegaon Market Committee Election Straight fight between advay hire dada bhuse supporters Announcement of candidates on Thursday nashik news)

निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांनी पॅनल निर्मितीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. २० एप्रिलला सकाळी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. तिसऱ्या पॅनलची शक्यता मावळली आहे. आपल्याच उमेदवारी मिळण्याची खात्री असलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे.

बाजार समितीवर गेल्या २० वर्षापासून दादा भुसे यांच्या समर्थकांची सत्ता आहे. सत्ता कायम ठेवण्याचे मोठे आवाहन श्री. भुसे यांच्यासमोर आहे. भुसे गटाकडून ग्रामपंचायत गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे.

दोन दिवसात भुसे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत १८ पैकी १५ नावे निश्‍चित केली आहेत. दोन दिवसात पॅनल जाहीर केले जाणार आहे. पॅनलमध्ये जुन्यांबरोबरच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिला व ग्रामपंचायत गटातील एका जागेसाठी खलबते सुरु आहे.

युवा नेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांचे पॅनल निवडणूक रिंगणात उतरणार आहे. श्री. हिरे यांनी पॅनलमधील जवळपास सर्व उमेदवारांची नावे निश्‍चित झाली आहेत. २० एप्रिलला उमेदवारांची घोषणा होणार आहे. सोसायटी गटात हिरे समर्थकांचा वरचष्मा आहे.

त्यामुळे या गटातून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील हिरे व भुसे समर्थकांमध्ये कडवा मुकाबला होणार आहे. बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांची भूमिका देखील निर्णायक राहणार आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

श्री. बच्छाव निवडणूक रिंगणात नसले तरी त्यांचा पाठिंबा कोणत्या गटाला मिळतो याबाबत उत्सुकता आहे. याबरोबरच इच्छुक उमेदवार भाजपचे सुनील गायकवाड व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र भोसले यांच्याही भेटी गाठी घेत आहेत.

या नेत्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता असली तरी हे तिन्ही नेते आपापल्या निवडक समर्थकांसह दोन्ही पॅनलमध्ये वर्णी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. २१ एप्रिलला चिन्ह वाटप तर २८ एप्रिलला मतदान होणार आहे.

निवडणुकीसाठी जागा -
ग्रामपंचायत गटात एकूण ४ जागा -
सर्वसाधारण- २

अनुसूचित जाती जमाती - १
आर्थिक दुर्बल घटक - १
ग्रामपंचायत गट मतदार संख्या - १ हजार २३२

सोसायटी गट एकूण ११ जागा -
सर्वसाधारण- ७
महिला राखीव- २
इतर मागासवर्गीय- १
भटक्या जाती विमुक्त जमाती- १
सोसायटी गट मतदार संख्या - १ हजार ५६८

व्यापारी गट एकूण २ जागा -
एकूण मतदार - १ हजार १२५

हमाल मापारी एकूण जागा- १
एकूण मतदार - २६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT